आरोग्य कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू

0
229

धानोरा=आरोग्य कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलीचा मलेरियाने मृत्यू झाला, असा आरोपी मृतक मुलीच्या वडीला केला असून याची योग्य चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
२२ ऑक्टोबर रोजी आरोग्य उपकेंद्र मुरूमगाव अंतर्गत येत असलेल्या आमपायली येथील बबिता चतुर नैताम या ११ वर्षीय मुलीचा मलेरियाने मृत्यू झाला. बबिता ही आर्शमशाळा मुरूमगाव येथे ५ व्या वर्गात शिकत होती. परंतु कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ती आईवडीलासोबत घरीच राहत होती. २१ ऑक्टोबरला तिची प्रकृती बरी वाट नसल्याने वडीलांनी मुरूमगाव आरोग्य उपकेंद्रात उपचाराकरिता आणले. डॉक्टरांनी तिची तपासणी करून रक्तनमुणे घेण्यात आले. मात्र नार्मल असल्याने तिला घरी नेण्यात आले. दुसर्‍या दिवशी तिची मलेरिया रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने तिची प्रकृती खालावल्याने मुरूमगाव आरोग्य उपकेंद्रात आणले तेथे प्रथमोचार करून धानोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. बबिताची प्रकृती अधिकच खालावत असल्याने गडचिरोली रुग्णालयात रेफर केले. मात्र उपचारादरम्यान त्याच दिवशी सायंकाळी ७.३0 वाजता तिचा मृत्यू झाला.
मुलीच्या मृत्यूस आरोग्य कर्मचारीच जबाबदार आहेत. आरोग्य विभागातर्फे गावात जाऊन रुग्णांचे रक्तनमुणे घेतले जाते. परंतु माझ्या मुलीचे रक्तनमुने घेतल्या गेले नाही. आरोग्य कर्मचारी नियमित गावात येत नाही, कर्मचारी आपली जबाबदारी निट पार पारडली असती तर माझ्या मुलीचा जीव गेला नसता, आरोप बबिताच्या वडीलांनी केला आहे.