गोंदिया,दि.24 : जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मार्फत महिला किसान दिनानिमीत्त महिला किसान मेळावा कार्यक्रम गोंदिया पंचायत समिती सभागृहात घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गणेश घोरपडे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि उपसंचालक प्रणाली चव्हाण हया होत्या. तर मुख्य अतिथी म्हणून उपविभागीय कृषि अधिकारी भिमाशंकर पाटील, तंत्र अधिकारी कावेरी साळे, तालुका कृषि अधिकारी धनराज तुमडाम, कृषि अधिकारी श्री रहांगडाले, अंकुर सीड कंपनीचे संजय ठाकुर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनिल खडसे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) शैलेश बिसेन उपस्थित होते.
प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री घोरपडे यांनी महिला किसान दिनाचे महत्व सांगून शेतीत महिलांचे अनन्यसाधारण योगदान असल्याचे सांगितले. श्रीमती चव्हाण यांनी महिला किसान दिनाबद्दल महत्व सांगून महिलांचे शेतीतील महत्व व महिला शेतकरी कशा सक्षम होवू शकतील याबाबत मार्गदर्शन केले. श्री तुमडाम, श्रीमती साळे व श्री रहांगडाले यांनी सुध्दा महिला किसान दिनाबद्दल समयोचित मार्गदर्शन केले.
महिला किसान दिनानिमीत्त तालुक्यातील उद्योजक महिला शेतकरी तसेच प्रगतीशील महिला शेतकरी यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. यामध्ये सुनिता भाजीपाले, प्रिती टेंभरे, अनिता ठाकुर व मंजुषा आकरे या महिला शेतकऱ्यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन कृषि सहायक श्रीमती कुंदे यांनी केले. उपस्थितांचे आभार कृषि अधिकारी श्री रहांगडाले यांनी मानले. कार्यक्रमास तालुक्यातील प्रगतीशील महिला शेतकरी व माविमचे गटातील महिला उपस्थित होत्या.