सेवापुस्तिका गहाळप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करा – आ. नागो गाणार

0
311

लाखनी,दि.25ःमहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रश्नांना घेऊन शिक्षण विभाग माध्यमिक येथे सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी एका सेवानवृत्त मुख्याध्यापकांचे सेवानवृत्ती प्रस्ताव व सोबत महत्त्वाची असलेली सेवा पुस्तिका गहाळ झाल्याचे लक्षात आले. यावेळी आमदार नागो गाणार यांनी हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे निदर्शनास आणून देत तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.
आदिवासी शिव विद्यालय राजेगाव येथील सेवानवृत्त मुख्याध्यापक एकनाथ बडवाईक यांनी ३ ऑगस्ट २0२0 ला सेवानवृत्ती प्रकरण सादर केले होते. सेवा पुिस्तकेसहित हा प्रस्ताव गहाळ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
यावेळी शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी काळजीपूर्वक ही प्रकरणे निकाली निघतील, अशा प्रकारचे आश्‍वासन दिले. नानाजी जोशी विद्यालय शहापूर येथील शिक्षकांनी आतापयर्ंत विविध अन्यायाच्या ४0 तक्रारी विभागाला दिल्या. परंतु कोणतीही दखल विभागाने घेतली नाही हे प्रकरण देखील चर्चेला आले. संपूर्ण तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी असे निर्देश आमदार गाणार यांनी शिक्षणाधिकारी यांना दिले.
देवी सरस्वती विद्यालय शिंगोरी या शाळेत स्थानांतरणापूर्वी सेवेत असलेल्या शिक्षकांची तक्रार, स्व. रतिराम टेंभरे विद्यालय लोहारा येथील देवानंद कटरे यांचे निवड श्रेणी प्रकरण, सैनिकी विद्यालय केसलवाडा येथील शिक्षकांचे तीन ते चार महिनेपयर्ंत न होणारे वेतन, ज्ञानेश्‍वर विद्यालय सालेभाटा सेवानवृत्त मुख्याध्यापक सुरेश कामथे यांचे रजा रोखीकरण बिल इत्यादी प्रकारची अन्य प्रकरणे यावेळी चर्चेत घेण्यात आली. ही सर्व प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात येतील असे आश्‍वासन शिक्षणाधिकारी माध्यमिक संजय डोर्लीकर यांनी शिक्षक परिषदेच्या पदाधिकार्‍यांना दिले.
यावेळी शिक्षण विभागाचे उप शिक्षणाधिकारी शेंडे, वरिष्ठ लेखा परीक्षक बोरकर, वेतन अधीक्षक प्रतिभा मेर्शाम व शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यवाह अंगेश बेहलपाडे, अध्यक्ष अशोक वैद्य, के.डी. बोपचे, पी.एम. नाकाडे, अशोक रंगारी, सुभाष गरपडे, दिशा गद्रे, मनीषा काशीवार, यादव गायकवाड, हरिहर पडोळे, दिलीप वाणी, महादेव तेलमासरे, राजू बारई, राजेश निंबार्ते, पांडुरंग टेंभरे, राजेंद्र कढव, पुरुषोत्तम डोंमळे, प्रदीप गोमासे आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहविचार सभेला उपस्थित होते.