पोटफोडी नदीवर उंच पुलाचे बांधकाम करा

0
337

गडचिरोली=तालुक्यातील चांदाळा ते कुंभी मार्गावरील पोटफोडी नदीवर उंच पुल नसल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात लहान मुले व मोठी माणसे, बैल जोड्या पाण्यात वाहून जाण्याच्या अनेक दु:खद घटना घडल्या आहेत. त्यामुळे सदर नदीवर उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी गावकर्‍यांनी आ. डॉ. देवराव होळी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सदर मार्गावरील फोटफोडी नदीवर कमी उंचीचा पूल असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात किमान ५0 दिवस कुंभी गावाचा अन्य गावांशी तुटतो. मागील वर्षी हेमंत केशव निकुरे नावाचा ९ वर्षीय बालक पुराच्या पाण्यात याच पुलावरून वाहून गेला. परंतु त्याला अजून पयर्ंत कोणते प्रकारचे नुकसान भरपाई मिळाली नाही. यापूर्वी चांदाळा येथील पेंदाम यांचा मुलगा ही वाहून गेला. अनेकदा शेतकर्‍यांच्या बैलजोड्या, वाहने या पुलावरून वाहून गेले. परंतु गावकर्‍यांना कोणत्या प्रकारची मदत मिळाली नाही. त्यामुळे गावकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष देवून फोटफोडी नदीवर उंच पूलाचे बांधकाम तातडीने करावे, अशी मागणी चांदाळा कुंभी येथील रामदासजी सुरपाम, मोरेश्‍वर नैताम, ओमेश्‍वर सोनुले, यादवजी नैताम यांचेसह गावकर्‍यांनी आ. डॉ. देवराव होळी यांच्याकडे केली आहे. यावेळी उपस्थित धानोरातालुका प्रभारी संपर्कप्रमुख अनिल पोहनकर व चामोर्शी तालुका अध्यक्ष दिलीप चलाख उपस्थित होते.