गोंदिया,दि.25जिल्ह्यात कोरोना संसर्गाची बाधा झालेले रुग्ण उपचारातून बरे होण्याचे प्रमाण वाढतांना दिसत आहे.तर बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण देखील थोडे कमी झाल्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 25 ऑक्टोबर रोजी प्राप्त अहवालात नविन 75 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे.124 बाधित रूग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केली.देवरी तालुक्यातील चिचगड येथील 70 वर्षीय रुग्णाचा आणि गोंदिया शहरातील 69 वर्षीय रुग्णाचा गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान काल उशिरा रात्री मृत्यू झाला.
75 कोरोना बाधित रुग्ण आज आढळले.ती रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -40, तिरोडा तालुका -00, गोरेगाव तालुका -02,आमगाव तालुका -08, सालेकसा तालुका-02, देवरी तालुका- 05, सडक/अर्जुनी तालुका -05, अर्जुनी/मोरगाव तालुका -12 आणि इतर राज्य/बाहेर जिल्ह्यातील एक रुग्ण आढळून आला.
जिल्ह्यात बाधित रुग्ण आजपर्यंत तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आढळले. गोंदिया तालुका -5338, तिरोडा तालुका -1124, गोरेगाव तालका- 382,आमगाव तालुका -646, सालेकसा तालुका -386, देवरी तालुका-442, सडक/अर्जुनी तालुका-398,अर्जुनी/मोरगाव तालुका-482 आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले- 106 रुग्ण आहे.असे एकूण 9304 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे.
जिल्ह्यातील शासकीय व खाजगी कोविड रुग्णालय तसेच कोविड केन्द्रात उपचार घेत असलेल्या 124 रूग्णांनी आज कोरोनावर मात केली. तालुकानिहाय ती रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका – 55, तिरोडा तालुका – 02, गोरेगाव तालुका -05, आमगाव तालुका -20, सालेकसा तालुका-03, देवरी तालुका -15, सडक/अर्जुनी तालुका – 11 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-13 असा आहे.
आतापर्यंत 8242 रूग्णांनी कोरोनावर मात केली.ती रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका -4733, तिरोडा तालुका- 1036,गोरेगाव तालुका -352, आमगाव तालुका -571,सालेकसा तालुका- 367, देवरी तालुका- 367, सडक/अर्जुनी तालुका-362,
अर्जुनी/मोरगाव तालुका-374 आणि बाहेर जिल्हा/राज्यातील 80 रुग्णांचा समावेश आहे.
क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका -533,तिरोडा तालुका-72,गोरेगाव तालुका- 26, आमगाव तालुका -69,सालेकसा तालुका -17, देवरी तालुका-72, सडक/अर्जुनी तालुका- 33,अर्जुनी/मोरगाव तालुका-104 आणि बाहेर जिल्हा व बाहेर राज्यातील 15 असे एकूण 942 रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.
क्रियाशील असलेले 468 बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय ते पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-211, तिरोडा तालुका-45, गोरेगाव तालुका -13,आमगाव तालुका-42, सालेकसा तालुका-15,देवरी तालुका -68,सडक/अर्जुनी तालुका-18, अर्जुनी/मोरगाव तालुका-56 रुग्ण आहेत.
कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 87.26 टक्के आहे.बाधीत रुग्णांचा मृत्यु दर हा 1.23 टक्के आहे.तर डब्लिंग रेट हा 67.07 टक्के आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यातील 120 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-72, तिरोडा तालुका-16, गोरेगाव तालुका-4, आमगाव तालुका -6, सालेकसा तालुका-2,देवरी तालुका-3, सडक/अर्जुनी तालुका-3, अर्जुनी/मोरगाव तालुका -4 व बाहेर जिल्हा व राज्यातील दहा रुग्णांचा समावेश आहे.
विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत 37144 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 28205 नमुने निगेटिव्ह आले. तर 5838 नमुने पॉझिटिव्ह आले.तर 46 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
170 व्यक्ती गृह विलगिकरणात आणि 2 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीतून आतापर्यंत 33614 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 30215 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. 3399 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 10 चमू आणि 8 सुपरवायझर जिल्ह्यातील 8 कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी कार्यरत आहे. गोंदिया तालुका – 01,आमगाव तालुका -00 सालेकसा तालुका -00, देवरी तालुका -00, सडक/अर्जुनी तालुका -01, गोरेगाव तालुका-00, तिरोडा तालुका -06 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका -00 असे कंटेंटमेंट झोन आहे.