तीस वर्षापुर्वि पारित आदेशाची अंमलबजावनी न केल्याने शेतकरी बसला आमरण उपोषणावर

0
174

देसाईगंज(गडचिरोली)दि २७::= तीस वर्षापुर्वि अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालयाने पारित केलेल्या आदेशाला वरिष्ठ न्यायालयात स्थगीती अथवा आवाहन दिले नसतांना अधिकार अभिलेख पंजी नुसार ताबा व वहिवाटीत असलेल्या शेत जमिनीच्या क्षेत्राची व नावात दुरुस्ती करण्याबाबत देसाईगंज महसुल विभाग टाळाटाळ करित असल्याने शेतकय्राला आज  २७ ऑक्टोंबरला ११ वाजता पासुन आमरण उपोषणाला बसावे लागले आहे.
देसाईगंज येथील शेतकरी राकेश मारोती राखडे याने मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांना १२ ऑक्टोंबर ला दिलेल्या लेखी निवेदनात अधिकार अभिलेख पंजी नुसार ताबा व वहिवाटीत असलेल्या शेत जमिनीच्या क्षेत्राची व नावात दुरुस्ती करण्याबाबत भुमि अभिलेख यांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावनी न केल्यास दि २७ ऑक्टोंबर पासुन आमरण उपोषणाला बसणार असल्याचे कळविले होते.
या निवेदनात अधिकार अभिलेख पंजी नुसार मौजा विर्शी तुकुम येथील सर्वे नं २३८ व २४०/२ (जुना) तर भुमापन क्रमांक ३७६ नविन मधील क्षेत्र १.०४ हे आर शेत जमिन वडीलोपार्जीत पासुन ते आता पर्यंत ताबा वहिवाटीत आहे या बाबतीत अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय यांनी क्षेत्राची व नकाशावर दुरुस्ती करण्याबाबत दि २७ मे १९८८ ला आदेश पारित केले होते. या आदेशाला आता पर्यंत वरिष्ठ न्यायालयात स्थगीती अथवा आवाहन दिले नाही हे विशेष.
या आदेशाची अंमलबजावनी करण्याबाबत उप अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय देसाईगंज यांना दि २८ ऑगस्ट २०२० ला निर्देश दिले होते.त्या नुसार उपोषण कर्त्याच्या वडील मारोती जागो राखडे व इतर यांचे नांवे नविन नमुना ७/ १२ तयार करण्यासाठी सुधारित नकाशासह तहसीलदार देसाईगंज यांच्याकडे दि ४ सप्टेंबर २०२० ला पाठवले होते. याबाबत तहसीलदार देसाईगंज यांनी दि २३ सप्टेंबर २०२० ला मुळ प्रकरण संलग्नित करुन पुढील कार्यवाही करिता तलाठी विर्शी तुकुम यांच्याकडे पाठवले होते.
दरम्यान,तलाठी विर्शी तुकुम यांनी तहसीलदार यांच्या पत्रानंतर क्षेत्रात व नकाशावर दुरुस्ती करणे अपेक्षित होते परंतु सदर प्रकरण योग्य मार्गदर्शन मिळण्याबाबत मुळ प्रकरण अभिलेखासह उप विभागीय अधिकारी देसाईगंज यांच्याकडे पाठवुन क्षेत्रात व नकाशावर दुरुस्ती करण्याबाबत टाळाटाळ करित असल्याने अधिक्षक भुमि अभिलेख यांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावनी करुन शेतकरी कुटुंबास न्याय मिळवुन देण्यात यावे या करिता मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांना १२ ऑक्टोंबर ला पत्र पाठवले. मात्र या निवेदनानंतर देखिल कार्यवाही न केल्याने आज पासुन उप विभागीय अधिकारी देसाईगंज यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.