गोंदिया जिल्हयात 114 धान खरेदी केंद्रांना मंजूरी

0
1647

गोंदिया,दि.30 ृ पणन हंगाम 2020-21 मधील किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या तसेच गैर आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यासाठी एकूण 114 धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले आहे. आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्याच्या दृष्टीने प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ भंडारा या अभिकर्ता संस्थेद्वारा धानाची खरेदी करण्याच्या अनुषंगाने देवरी तालुका-20, सालेकसा तालुका-8, अर्जुनी/मोरगाव तालुका-6 व सडक/अर्जुनी तालुका-10 असे एकूण 44 धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील गैर आदिवासी क्षेत्रामधील शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यासाठी जिल्हा पणन अधिकारी गोंदिया या अभिकर्ता संस्थेद्वारे गोंदिया तालुका-16, गोरेगाव तालुका-12, तिरोडा तालुका-15, आमगाव तालुका-8, सालेकसा तालुका-2, देवरी तालुका-1, सडक/अर्जुनी तालुका-6 व अर्जुनी/मोरगाव तालुका-10 असे एकूण 70 धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांचा धान संबंधित खरेदी केंद्रावर विक्रीस न्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदी केंद्राची नावे व त्या केंद्राला जोडलेली गावे DMO ORDER2020-21