घोडीवाले, डिजे कैटरर्स व्यवसायीकांचे आंदोलांची दड़पशाही बंद करा – आमदार विनोद अग्रवाल

0
171

गोंदिया=कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सम्पूर्ण देशात लॉकडाउन केले गेले आहे. त्यामुळे कित्तेक व्यावसायिकांचे रोजगार ठप्प पडले आहेत. विशेष म्हणजे लग्न समारंभ वर अवलंबून असणारे व्यावसायिक डेकोरेशन व्यवसाय, कैटरर्स व्यवसाय, घोड़ी बग्घी, लॉन, मंडप, संगीत, बिछायत व्यवसाय , धुमाल, डीजे व्यवसाय मागील मार्च महिन्यापासून निकामी झाले आहेत. सध्या परिस्थिति त्यांना स्वत:चे उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यासाठी त्यांचे व्यवसाय सुरू करण्याच्या मागणीसाठी गोंदिया जिल्हा विवाह संघर्ष समिती स्थापन करून त्या माध्यमाने आपल्या मागण्या शासनाकडे मागण्यासाठी धरणा प्रदर्शन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु आंदोलकांवर कार्यवाही करत पोलिस विभागाकडून आंदोलन चिरडले जात असल्याची माहिती आमदार विनोद अग्रवाल यांना मिळाली. त्याच क्षणी आमदार विनोद अग्रवाल सर्कस मैदान येथे सुरू असलेल्या धरणा आंदोलनात सहभागी होवून प्रदर्शकांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यांच्या मागण्या रास्त असून शासनाने त्या पूर्ण कराव्या यासाठी पाठपुरावा करणार व सदर मागण्यासाठी शासनाला विनंती करणार असल्याचे आश्वासन आमदार विनोद अग्रवाल यांनी दिले.