भंडारा जिल्ह्यात आज 110 रुग्णांना डिस्चार्ज:कोरोना पॉझिटिव्ह 25

0
85

भंडारा दि. 02 : जिल्ह्यात आज 110 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7582 झाली असून आज 25 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8599 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्के आहे.

            आज 255 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 25 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 69 हजार 791 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 8599 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

            जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 07, मोहाडी 00, तुमसर 01, पवनी 04, लाखनी 00, साकोली 12 व लाखांदुर तालुक्यातील 01 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 7582 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 8599 झाली असून 796 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 221 झाली आहे.

            रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.17 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.57 टक्के एवढा आहे.