भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी होमराज पुस्तोळे, संदिप कापगते यांची नियुक्ती

0
165

अर्जुनी मोर. :- भारतिय जनता पार्टी युवा मोर्चा ची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहिर करण्यात आली आहे. यामधे अर्जुनी मोर. तालुक्यातील होमराज पुस्तोळे, व संदिप कापगते यांची जिल्हा कार्यकारिणी च्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतिय जनता युवा मोर्चा जिल्हा गोंदिया कार्यकारिणी भाजयुमो चे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचे सुचनेनुसार भाजपा जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, भाजपाचे भंडारा-गोंदिया जिल्हा प्रमुख वीरेंद्र अंजनकर, यांचे मार्गदर्शनात संजय कुलकर्णी यांचे सहकार्याने भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष ओम कटरे यांनी ही नियुक्ती केली आहे.भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्त झालेले संदिप कापगते हे यापूर्वी अर्जुनी मोर. तालुका भाजपा युवा मोर्चा चे तालुका अध्यक्ष होते.तर होमराज पुस्तोळे हे जिल्हा युवा मोर्चा चे कार्यकारिणी सदस्य होते.दोघांनी ही आपल्या निवडीचे श्रेय माजी मंत्री राजकुमार बडोले, जिल्हाअध्यक्ष केशवराव मानकर, व युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष ओम कटरे यांना दिले आहे. युवा मोर्चा चे जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणुन अर्जुनी मोर. तालुक्यातुन नरविस पटले,प्रविण विश्वास, विलास कापगते, गोपाल शेंडे,रामचंद रहेले, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त युवा मोर्चा पदाधिकारी यांचे तालुका भाजपा कार्यकारिणी, युवा मोर्चा तालुका कार्यकारिणी, महिला आघाडी, व विविध भाजपा आघाडीचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.