पदवीधर निवडणूकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण-जिल्हाधिकारी संदीप कदम

18434 मतदार ;; 27 मतदान केंद्र ;; 1 डिसेंबरला मतदान ;; 3 डिसेंबरला मतमोजणी

0
154
????????????????????????????????????

भंडारा दि. 09 : नागपूर विभाग पदवीधर निवडणूकीची प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून निवडणूकीसाठी भंडारा जिल्हयातील 18 हजार 464 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हयातील 27 मतदान केंद्रावर 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर 2020 ला नागपूर येथे मतमोजणी होणार आहे. निवडणूकीसाठी प्रशासन सज झालेले असून 12, 13 व 30 नोव्हेंबर रोजी अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित केल्याची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिली. निवडणूकीसाठी मणुष्यबळ नेमण्यात आले असून 7 क्षेत्रीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. 6 एफ.एस.टी टिम व एम.सी.एम.सी समिती स्थापन करण्यात आली आहे.

मतदार

तालूका पुरूष महिला एकुण मतदार
मोहाडी 908 396 1304
तुमसर 1897 1055 2952
भंडारा 3677 2325 6002
पौनी 1159 418 1577
लाखणी 1851 800 2651
साकोली 1791 649 2440
लाखांदूर 1157 351 1508
एकूण 12440 5994 18434

 

मतदार केंद्र

अ.क्र तालूका मुख्य मतदान केंद्र सहाय्यक मतदान केंद्र एकूण मतदान केंद्र
1 तुमसर 3 1 4
2 मोहाडी 2 0 2
3 भंडारा 5 4 9
4 पौनी 2 0 2
5 साकोली 2 2 4
6 लाखणी 3 1 4
7 लाखांदूर 1 1 2
  एकूण 18 9 27

000