आयटक व भाकपची१९ नोव्हे. जिल्हा कौन्सिल  सभा

0
102
भंडारा-: भंडारा जिल्हा आयटक  व भाकप च्या भंडारा जिल्हा कौन्सिलची सभा दिनांक 19 नोव्हेंबर 2020 रोजी गुरुवारला दुपारी ठीक १ वाजता राणा भवन भंडारा येथे आयोजित करण्यात आली आहे.सभेत 26 नोव्हेंबरच्या कामगार संघटनांचा देशव्यापी संप, विधान परिषद निवडणूक, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक, मेंबरशिप आणि स्थानिक प्रश्न व जनसमस्या इत्यादी विषयावर लाॅकडाऊनच्या  नियमांचे पालन करीत चर्चा करण्यात येईल.
       सभेत राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड शिवकुमार गणवीर , राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड हौसलाल रहांगडाले तसेच जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके हे मार्गदर्शन करतील.तरी आयटक व भाकप च्या जिल्हा कौन्सिल सदस्यांनी सभेला उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांनी केले आहे.