धान खरेदी सुरू करा अन्यथा आंदोलनाला सामोरे जा – आमदार विनोद अग्रवाल

0
138

गोंदिया= जिल्हयातील अर्थव्यवस्था धानपिकावर अवलंबून आहे. धानाचे पीक तयार होवून कापनीला आले असून अद्याप धान खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. 2 ते 3 दिवसात दिवाळीचा सन येत आहे. परंतु अद्याप आर्थिक गरज पूर्ण होण्याचे कथालेही मार्ग शेतकऱ्यांच्या पुढे नाहीत. स्वतचे कष्टाने तयार केलेले धान पीक विक्री अभावी अंगणात पडून असल्याने यंदाची दिवाळी अंधारातच जाते की के अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. या वर्षी अधिकमास असल्याने सर्व उत्सव आणि सन एक महिन्याने उशिरा आले असूनही अद्याप खान खरेदी सुरू न झाल्याने याबाबत सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे असे आमदार विनोद अग्रवाल यांनी केले आहे.

ऑनलाइन 7/12 ची अट शिथिल केली तरी धान खरेदी सुरू नाही

                शासनाने मागील वर्षी झालेल्या धान खरेदी घोटाळ्यावर उपाय म्हणून ऑनलाइन धान पर्याची ऑनलाइन इन्ट्री असलेल्या 7/12 वरच धान खरेदी करत असल्याची अट टाकण्यात आली होती. संपूर्ण जिल्ह्यात अद्याप धनाच्या पर्याची इन्ट्री ऑनलाइन 7/12 वर न झाल्याने शेतकरी धान विक्री करू शकत नव्हते. त्यावर आमदार विनोद अग्रवाल यांनी प्रशासनाकडे पत्र व्यवहार करून सदर अट शिथिल करण्यास विनंती केली होती. त्यावर उपाय म्हणून सदर अट शिथिल करण्यात आली. परंतु त्यानंतरही धान खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. 7/12 मध्ये पर्याची इन्ट्री करण्याचे कार्य पटवाऱ्यांवर सोपवविण्यात आले आहे. परंतु  सध्या त्यांच्या काही मागण्यांना घेवून पटवाऱ्यांनी असहकार आंदोलन पुकारले असल्याने ऑनलाइन करण्याचे कार्य मंदावले आहे. पटवाऱ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटर सारखे आवश्यक साहित्य सोबत सहकारी पुरवणे गरजेचे असून शासनाने याकडे लक्ष घालून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचीही मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी केली आहे.

संमतीपत्राची अट तत्काल शिथिल करा

                ऑनलाइन 7/12 ची अट शिथी केल्यावर परत पुनः नवीन अट शामील करण्यात आली. ज्यानुसार 7/12 वर असणाऱ्या सर्व खातेदारांचे संमती शिवाय धान विकता येणार नाही. महत्वाचे म्हणजे एक 7/12 वरील सर्व खतेदारांचे संमती पत्र सोबत जोडल्याशिवाय धान विक्री करता येणार नसल्याची अट जोडण्यात आलेली आहे. आमदार विनोद अग्रवाल यांनी सदर अट तत्काल रद्द करण्याची मागणी केली आहे. बरेच परिवारात शेती करणारा व्यक्ति एक असतो परंतु इतर त्यावर अवलंबून असतात किंवा बाहेर कामवायला गेलेले असतात. अश्या परिस्थितित शेतकऱ्यांना त्रास देणे शासनाने बंद करण्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी संताप व्यक्त केला आहे.

खाजगी व्यापाऱ्यांना धान विक्री करू नका

खाजगी व्यापाऱ्यांना धान विक्री करून स्वतचे आर्थिक नुकसान करू नका. शेतकऱ्यांनी थोड धीर ठेवून धान विक्री शासकीय धान विक्री केंद्रातच करा. आम्ही प्रशासनाला आणि शासनाला धान खरेदी केंद्र तत्काल सुरू करण्यासाठी बाध्य करीत आहोत. प्रशासन आणि शासनाला धान खरेदी करावेच लागेल या शब्दात आमदार विनोद अग्रवाल यांनी प्रशासनाची निंदा केली आहे.

तर शेतकऱ्यांच्या हितात दिवाळी नंतर आंदोलन करणार

                जर येत्या 2 दिवसात धान खरेदी सुरू झाली नसल्यास आम्ही शेतकऱ्यांच्या हितार्थ आंदोलन करणार असून जो पर्यन्त धान खरेदी सुरू केली जाणार नाही तोपर्यंत धरणा देणार असल्याची माहिती आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली आहे.