मुंबई दि.12=मुंबईला पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या जलाशयाला धोका निर्माण होणार असल्याची भीती निर्माण झाल्याने आरे कॉलोनी परिसरात बेकायदाल बांधलेली लाँजिंग बोर्डिंगस तात्काळ तोडावी अन्यथा राज्यपाल भवनासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे.
आमदार टी एम कांबळे यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्ष्याचे केंद्रीय महासचिव पँथर डॉ राजन माकणीकर व राज्य महासचिव पँथर श्रावण गायकवाड यांनी राज्यपाल, गृहमंत्री,स्थानिक पोलीस ठाणे, व पोलीस बृहन्मुंबई आयुक्त व स्थानिक उपायुक्त यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की,मुंबईला पिण्याचे पाणी पुरविणारे आरे परिसरात दोन तलाव असून याच परिसरात विनापरवाना ग्रीन झोनमध्ये काही लाँजिंग बोर्डिंग बांधण्यात आले आहेत.
या लोजिंग बोर्डिंगस ना कोणी परवाना दिला ? याचा तपास लावून संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करुन “त्या” दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, शिवाय अतिक्रमण झालेले असतानाही कानाडोळा करून अतिक्रमण न तोडणार्या अधिकाऱ्यांनाही जाब विचारला जावा असे म्हंटले आहे.
या ठिकाणी कोणी संशयित सहज व सोपय मार्गाने मुक्काम करून या जलाशयात विष ओतू शकतो किंवा जलाशय फोडू शकतो किंवा बॉम्ब ने उडवून देऊ शकतो या गोष्टीला नजरंदाज करणे म्हणजे गुन्हा व गुन्हेगाराला बळकटी देण होय असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.या परिसरातील लाँजिग व बोर्डींगमध्ये सहज व सोप्या मार्गाने कामक्रीडेसाठी रूम्स उपलब्ध जरून दिले जातात हा प्रकार बंद करण्यासाठी अनधिकृत लाँजिंग बाेर्डिंग 8 दिवसात न तोडल्यास उग्र आंदोलन उभे करू व आंदोलनाचाच एक भाग म्हणून राज्यपाल भवनासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा डॉ राजन माकणीकर व श्रावण गायकवाड यांनी दिला आहे.