भंडारा दि.13: राज्यातील अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विशेष पंधरवाडयाचे आयोजन (दिनांक 14 ते 30 नोव्हेंबर २०२०) या कालावधीत बाल न्याय मुलांची (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय/स्वंयसेवी बालगृहात दाखल होणाऱ्या अनाथ मुलांना संस्थेतुन बाहेर पडतांना त्यांच्याजवळ जातीचे प्रमाणपत्र नसल्याकारणाने त्यांना शैक्षणिक,आर्थीक,सामाजिक सवलती,अनुदान व विशेष लाभ मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होत आहे
शासन निर्णय दि. 06 जुन 2016 अन्वये बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियमाअंतर्गत मान्यता प्राप्त अनुदानीत/विनाअनुदानीत संस्थामध्ये दाखल असलेल्या व खालील निकष पुर्ण करणाऱ्या संस्थेतील अनाथ मुलांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार राज्यातील पात्रताधारक अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्याकरीता विभागीय स्तरावर दि.१४ ते ३० नोव्हेंबर २०२० या कालवधीमध्ये पंधरवाडा राबविण्यात येत आहे. सदरचा पंधरवाडा यशस्वीपणे राबविण्याकरीता विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणा बाल कल्याण समिती, बालकाच्या काळजी कार्यरत असलेल्या संस्थांचे अधिक्षक, व इतर सर्व संबधीत यांना माहिती होण्याकरीता तसेच अनाथ प्रमाणपत्रासंबधीचे सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी या कार्यालयाकडुन आव्हाहन करण्यात येत आहे . अटी व शर्ती १.आई वडीलांचा शोध घेवुन त्यापैकी कोणीच हयात नसल्याबाबतची खात्री संबधीत यंत्रणेस झाली असणे व त्याबबातचे संस्थेचे अधिक्षक यांचे प्रमाणपत्र जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रमाणित करावे . २. जिल्हयाच्या बाल कलयाण समितीने सदर लाभार्थ्यांचे आई वडील हयात नसल्याचे व लाभार्थी अनाथ असल्याचे चौकशअंती प्रमाणित करुन देणे आवश्यक त्यासाठी बाल कल्याण समितीने जन्म मृत्यू नोंद रजिस्टर, शाळा सोडल्याचे दाखला, प्रवेश निर्गमित रजिस्टरचा दाखला यापैकी एक ग्राह्या धरावा. वरील निकष पुर्ण करणारे मुलं ज्या सस्थेत आहेत त्या संस्थेच्या आधिक्षकांनी अनाथ प्रमाणपत्र मिळणेबाबतचे प्रस्ताव संबधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे सादर करावा.