गडचिरोली तीन मृत्यूसह आज 53 नवीन कोरोना बाधित, 81 कोरोनामुक्त

0
133

गडचिरोली,दि.17: आज जिल्हयात 53 नवीन बाधित आढळून आले. तर आज 81 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6971 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6469 वर पोहचली. तसेच सद्या 429 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 73 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. तीन मृत्यूमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 56 वर्षीय एका पुरुषाचा, गडचिरोली येथील 79 व 50 वर्षीय दोन उच्च रक्तदाब व मधुमेह ग्रस्तांचा समावेश आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.80 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 6.15 टक्के तर मृत्यू दर 1.05 टक्के झाला.

नवीन 53 बाधितांमध्ये गडचिरोली 19, अहेरी 20, आरमोरी 02, भामरागड 01, चामोर्शी 03, धानोरा 03, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 0, मुलचेरा 01, सिरोंचा 01 व वडसा येथील 3 जणांचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 81 रूग्णांमध्ये गडचिरोली 37, अहेरी 8, आरमोरी 8, भामरागड 3, चामोर्शी 6, धानोरा 1, एटापल्ली 8, मुलचेरा 2, सिरोंचा 3, कोरची 1, कुरखेडा 6 व वडसा मधील 0 जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील रामनगर 1 , वाकडी 1, लाझेंडा 2, शाहु नगर 1, स्थानिक 3, गोकूल नगर 1, आय टी आय स्केअर 1, पेपर मिल कॉलनी 1, सर्वोदय वार्ड 1, कन्नमवार वार्ड 1,कोटगल 01, सोनापूर कॉम्पलेक्स 01, बसस्टॉप एरिया 01 अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 11,नागेपल्ली 1, स्थानिक 08,आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये बर्डी 01, खूटेबोडी 01, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 01, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये अळयाळ 1, दुर्गापूर 02, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 01, जवळवाही 01, बंधानो 01, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये सुंदर नगर 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये कोटपल्ली 01 तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये शिदी कॉलनी 1, हनुमान वार्ड 01, माता वार्ड 01 असा समावेश आहे. तसेच इतर राज्यातील 0 आणखी . तर इतर जिल्ह्यातील 3 जणाचा समावेश आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्हयातील 01 व गोदिया जिल्हातील 02 बाधितांचा समावेश आहे