जीएमसीत कोरोना वॉरियर्स डॉक्टरचा मृत्यू

बाई गंगाबाई रुग्णालयात रुग्ण तपासणीदरम्यान संसर्ग

0
3672

गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत बाई गंगाबाई महिला रुग्णालयात बालरोगतज्ञाचे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या महिला डॉक्टरचा सोमवारी कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. डॉ. रोहिणी गजभिये असे मृत डॉक्टरचे नाव आहे.

डॉ. रोहिणी गजभिये मुळच्या नागपूर येथील होत्या. त्यांचे सुक्ष्म जीवशास्त्र या विषयात एमबीबीएस एमडी चे शिक्षण झाले होते. त्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देत होत्या. त्यांना शिक्षणाची आवड असल्याने बालरोग विभागतज्ञ म्हणून काम करायची ईच्छा असल्याने प्रवेश घेतला. त्या पदव्युत्तरच्या दुसऱ्या वर्षात होत्या. यापूर्वी त्यांनी कोरोना वॉर्डात देखील कामगिरी बजावली. रुग्ण तपासणी दरम्यान त्या कोरोना बाधिताच्या संपर्कात १३ नोव्हेंबर रोजी आल्या. त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी(ता. १६) त्यांचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाला.

गोंदियातील चार डॉक्टरचा मृत्यू

गोंदियात कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या शंभरीकडे वळत आहे. त्यात सोमवारी महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्याने मृत झालेल्या डॉक्टरांची संख्या चार झाली आहे. त्यात डॉ. शहा, डॉ. सलाम दाम्पत्य आणि आता वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. रोहिणी गजभिये यांचा समावेश आहे.