भंडारा :- भंडारा नगर परिषद आपल्या नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यास असमर्थ ठरली आहे आणि याकडे नगर प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत भंडारा नगर परिषदेने तात्काळ शुद्ध पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था व सा.बा.विभागाने रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी भाकपचे जिल्हा सचिव व माजी नगरसेवक कॉम्रेड हिवराज उके यांनी केली आहे. शुद्ध व पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि ती पुरविण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे जसे शहरात नगर परिषद आणि गावात ग्रामपंचायत पण दोन्ही संस्थांच्या नाकर्तेपणामुळे लोकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
ही अत्यंत खेदाची बाब आहे. भंडारा शहराला बहुप्रतीक्षित व अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना अनेक वर्षे जन आंदोलन केल्यानंतर ज्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी नगरसेवक कॉम्रेड हिवराज उके तसेच अनेक जणसंघटनांचा त्यात मोठा वाटा आहे या सर्वांच्या प्रयत्नामुळे योजना मंजूर झाली आहे. योजना मंजुरीच्या सुमारे एक वर्षानंतर मोठा गाजावाजा करून नगराध्यक्षांनी तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ रोजी या योजनेचे भूमिपूजन केले होते. परंतु योजनेच्या पूर्ततेची मुदत केव्हाच संपलेली असली तरी अजून पर्यंत अर्धे काम देखील झाले नाही आणि मुदतवाढ मिळूनही सदर काम केव्हा पूर्ण होईल याचा थांगपत्ता नाही. नगरपरिषदेच्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य संकटात सापडले असले तरी नगर व जिल्हा प्रशासन जाब का विचारत नाही ? तसेच सदर योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू असूनही या कामाची जबाबदारी का फिक्स केली जात नाही असा प्रश्न कॉम्रेड हिवराज उके यांनी उपस्थित केला असून आमदार, खासदार या विषयावर काहीच कसे बोलत नाही असेही कॉ.हिवराज उके यांनी म्हटले आहे.
याबद्दल नगराध्यक्ष तसेच जिल्हाधिकाèयांनी खुलासा करावा व युद्धस्तरावर शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम पूर्ण करण्यास संबंधित यंत्रणेला बाध्य करावे अन्यथा लवकरच जनआंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी तसेच यासोबतच दुसरी गंभीर समस्या म्हणजे शहरातील अनेक मुख्य मार्ग फारच खराब झाले आहेत त्यात भंडारा तुमसर रोडचा प्रमुख्याने समावेश आहे. तसे बघितल्यास भंडारा शहरातील जेल रोड, खाम तलाव रोड, रुग्णालय ते कारधा ीं-ेिळपीं रोड इत्यादी फारच जीवघेणे झाले आहेत. पण शास्त्री चौक ते तुमसर रोड दिवाळीपूर्वीच खड्ड्यांवर कार्पेट लेव्हलिंग चे तात्कालिक काम करण्याचे आश्वासन दिनांक ४ नोव्हेंबर ला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याने जिल्हा सचिव कॉ. हिवराज उके यांनी रास्ता रोको आंदोलनाचे आवाहन केले असता आंदोलनाच्या ठिकाणी येऊन दिले होते. ते आश्वासन देखील अजून पूर्ण झाले नाही. तेव्हा येत्या आठ-दहा दिवसात रोडचे काम आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय युद्धस्तरावर न केल्यास ज्या दिवशी जे कोणते मंत्री विश्रामगृहात येतील त्या दिवशी त्यांचे लक्ष या दोन्ही समस्येकडे वेधण्यासाठी भाकपच्या नेतृत्वात इतर संघटनांना सोबत घेऊन लवकरच जन आंदोलन करण्यात येईल असे आवाहन भाकपचे जिल्हा सचिव व माजी नगरसेवक कॉम्रेड हिवराज उके यांनी केले आहे.