अर्जुनी मोरगाव-तालुक्यातील आधारभूत धान खरेदी गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनद्वारे केंद्र हे तालुका शेतकरी खरेदी विक्री समिती अजूर्नी मोरगाव ही संस्था चालवित आहे. महागाव अंतर्गत बोरी व खोडदा महागाव केंद्रावर शेतकर्यांचे धान खरेदी केंद्रावर शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. सदर संस्थाही धान खरेदी केंद्र व्यवस्थित हाताळत नाही. त्यामुळे धान खरेदी केंद्रावरील सावळागोंधळ व शेतकर्यांची लूट थांबवा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी गोंदिया व अजुर्नी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
खरीप हंगाम व रब्बी हंगाम २0२0-२१ मध्ये शेतकर्यांकडून गोडाऊन भाडे म्हणून प्रति क्विंटल दोन किलो धान अतिरिक्त घेण्यात आले आहेत. हमालीच्या नावावर प्रति शेतकर्यांकडून धानाचा प्रती कट्टा सात रुपये वसूल करण्यात येत आहेत, धानाचे मोजमापन झाल्यावर शेतकर्यांना त्यांचा बारदाना परत केला जात नाही. धान मोजणीसाठी शेतकर्?यांनी आपले धान केंद्रावर आणले आहे. या केंद्रांवरून शेतकर्यांच्या धानाची चोरी होत आहे. याबाबत संस्थेकडे विचारणा केली असता, संस्थेने कुठलेही उत्तर दिले नाही. असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या धान खरेदी केंद्राची चौकशी करून, शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी किशोर तरोणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन सहायक जिल्हा पणन अधिकारी घोनाडे यांना १७ नोव्हेंबरला देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, किशोर तरोणे, हिरालाल शेंडे व शेतकरी उपस्थित होते.