ककोडी,(विनोद सुरसावंत)दि.21ः गोंदिया जिल्ह्यात गत काही दिवसांपासून थंडीचा प्रभाव कमी होऊन ढगाळी वातावरण होते.शुक्रवारी सकाळपासूनच वातावरण कोरडे होते. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे ककोडी तसेच ककोडी परिसरात अनेक शेतकऱ्यांचे धानाचे पुजने आणि कापणी करून ठेवल्या धानाचे मोठया प्रमाणावर पावसामुळे नुकसान झाले आहे.
ह्या परिसरात मोठ्या प्रमाणावर शेतकरी धान उत्पादक आहेत, तेहि फक्त खरिप लागवड करतात. अचानक निसर्गाच्या झालेल्या ओल्या मारा मुळे शेतकरी हतबल झाले आहेत.या पावसाने शेतकर्यांमध्ये धडकी भरविली आहे. सध्या रब्बी पिकांचा हंगाम सुरू असून पेरणी सुरू आहे तर अनेक ठिकाणी खरीप हंगामातील धानाची कापणी आटोपली असून धानाच्या पेंड्या बांधण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे शेतकर्यांचे धान कडपे व मळणीसाठी रचून ठेवलेले पुंजने पाण्यामुळे भिजले. यामुळे शेतकर्यांमध्ये धानाची पत खराब होणार असल्याची चिंता शेतकर्यंमध्यक निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यात ढगाळी वातावरण आणि अधून-मधून पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अवकाळी पाऊस पेरणी झालेल्या पिकांना फायद्याचा असला तरी तो तूर, हरभरा, पोपट आदी पिकांसाठी हानिकारक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.