बजरंग दल कार्यालयातील वात्सल्य धाम येथील मुलांसोबत साजरी केली दिवाळी

0
238

गोंदिया==  देशात पसरलेल्या बजरंग दल, दुर्गा वाहिनी, विश्व हिंदू परिषद सारख्या धार्मिक संघटनांनी भारतीय संस्कृति आणि परंपरेला निरंतर ठेवून जोपासना केली आहे. भारतातील विविध क्षेत्रातील बेघर मुलांचे पालन पोषण सोबतच त्यांना उत्कृष्ट शिक्षण आणि संस्कार देण्याचे कार्य निरंतर सुरू आहे, असे मत आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले. ते गोंदिया येथील बजरंग दल कार्यालयात सुरू असलेल्या वात्सल्य धाम येथे आयोजित दिवाळी भेट कार्यक्रमात बोलत होते. मागील 14-15 वर्षापासून गोंदिया येथे वात्सल्य धाम सुरू आहे. ज्यात भारतातील विविध क्षेत्रातून अनाथ मुलांना निवासी राहण्याची व्यवस्था सोबतच शिक्षण आणि संस्कार पुरविण्याचे उत्तम कार्य केले जात आहे.

            या कार्याची सुरुवात  मेझोराम, नागालैंड, सिक्किम, त्रिपुरा, आसाम अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपुर या राज्यातील शरणार्थी कंप मधील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी देशातील विविध क्षेत्रात पाठवून शिक्षण देण्याचे कार्य अशोक सिंगल यांनी सुरू केले होते. तेव्हा पासून आज पर्यन्त वात्सल्य धाम हि संकल्पना सुरू असून दर वर्षी हजारो विद्यार्थी घडविण्याचे कार्य वर्षानुवर्षे सुरू आहे. गोंदिया येथील कार्यालयात मागील 14-15 वर्षापासून वात्सल्य धाम सुरू असून सध्या 15 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

            या वेळी त्यांना त्यांच्या आवडीचे कपडे, थंडीचे कपड़े, दिवालीचा फरसान, मिठाई इत्यादि साहित्याचे वितरण आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या सोबत राष्ट्रीय स्यंमसेवक संघचे दलजीत सिंह खालसा, होतचंद छतवानी, बजरंग दलचे महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्रीय संयोजक देवेश मिश्रा, भीकम शर्मा, उदयकुमार भ्रमर, जियंदराम आयलानी, घनश्याम उदासी, संजू आहूजा, माधवदास शिवदासानी, प्रकाश उमालकर, मोरेश्वर कुथे, दीपक बड़वाईक, नंदलाल दावानी, अंकित कुलकर्णी आणि सेवा निवृत्त कर्मचारी जेष्ठ नागरिक उपस्थित होते.