भंडारा जिल्ह्यात आज 83 कोरोना पॉझिटिव्ह;01 मृत्यू

0
303

भंडारा दि. 21 : जिल्ह्यात आज 25 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 8904 झाली असून आज 83 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9803 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.51 टक्के आहे.

            आज 876 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 83 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 81 हजार 418 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 9947 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

            जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 25, मोहाडी 02, तुमसर 13, पवनी 07, लाखनी 16, साकोली 11 व लाखांदुर तालुक्यातील 09 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 8904 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 9947 झाली असून 804 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 01 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 239 झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.51 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.40 टक्के एवढा आहे.

शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.