रेल्वेगाड्या रद्द करू नये-ड्रामा

0
21

गोंदिया दि.२२:: कोहर्‍याच्या शक्यतेमुळे थंडीच्या दिवसांत दिल्ली येथे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या बिलासपूर झोनने एका प्रसिद्धीपत्राद्वारे रेल्वे गाड्या रद्द करण्याची घोषणा केली.मात्र सदर निर्णयामुळे प्रवासांना मोठाच मनस्ताप होणार असून रेल्वेने गाड्या रद्द करू नये, अशी मागणी डेली रेल्वे मुव्हर्स असोसिएशनने (ड्रामा) रेल्वेमंत्र्यांना केली आहे.
ड्रामाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी दिलेल्या निवेदनानुसार, रेल्वे गाड्या रद्द न करता दिल्लीच्या आधी येणारे स्थानक झांसी, ग्लालियर, भोपालपर्यंत चालविण्यात यावे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल.
कोहर्‍याचा प्रभाव कमी करण्यासाठी गाड्या रद्द करणे, हे उपाय नसून त्यासाठी वैज्ञानिक व्यवस्था करण्यात यावी. कोहर्‍याच्या शक्यतेमुळे आरक्षणसुद्धा बंद करण्यात आले आहे. रेल्वे विभागाने एकतर्फी निर्णय घेतल्यामुळे जनतेत रोष आहे. सदर प्रकरणाची रेल्वेमंत्र्यांनी दखल घेण्यासाठी ड्रामाचे गोपाल अग्रवाल, अशोक शर्मा, जितेंद्र परमार, मेहबुब हिरानी, गोकुल कटरे, दिलीप रोचवानी, साजन वाधवानी आदी रेल्वे समितीच्या सदस्यांनी जिल्ह्याचे तिन्ही खासदार प्रफुल्ल पटेल, नाना पटोले व अशोक नेते यांना निवेदन पाठविले आहे.