स्पर्धांमुळे स्वदेशी खेळांना नवचैतन्य प्राप्त होईल

0
21

नवेगावबांध दि.२२: सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्वदेशी खेळ हे फक्त प्राथमिक शाळांपुरतेच र्मयादित राहिलेले आहेत. परंतु गणेश मंडळांनी कबड्डी सारख्या खेळाला उत्तेजण देण्यासाठी काम करणे ही प्रशंसनीय बाब आहे. यामुळे ग्रामीण भागता चांगले खेळाडू तयार होतील. अशा स्पर्धांमुळे स्वदेशी खेळांना नवचैतन्य प्राप्त होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी केले.
येथील सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ गोवर्धन चौकच्यावतीने आयोजित प्रौढ कबड्डी स्पर्धेच्या उद््घाटनप्रसंगी रविवारी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य होमराज कोरेटी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच लिना डोंगरवार, सामाजिक कार्यकर्ता नवल चांडक, ग्रामपंचायत सदस्य ऋषी पुस्तोडे, ओमप्रकाश काशीवार, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष एस.एम. नरुले, जगदीश पवार, मुलचंद गुप्ता, किशोर शंभरकर, अशोक हांडेकर, रमन डोंगरवार, सावरटोलाचे उपसरपंच भागवत मुंगमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम बजरंग बलीच्या प्रतिमेचे पूजन व फित कापून तरोणे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद््घाटन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण ३0 संघांनी भाग घेतला. त्यातील देवकृपा क्रिडा मंडळ विरुद्ध ग्रीन आर्मी क्रीडा मंडळ यांच्यात उद्घाटकीय सामना लावून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. अशोक परशुरामकर यांनी संचालन करून आभार मानले. कार्यक्रमासाठी गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.