गोरेगाव:-स्थानिक जगत कला ,वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालय गोरेगाव येथे मराठी वाङ्मय मंडळातर्फे वि.वा.शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीप्रीत्यर्थ मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.एन.वाय.लंजे तर प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. एस. एस.भैरम,प्रमुख वक्ता म्हणून स्व.निर्धनराव वाघाये पाटील महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा.जगदीश भैसारे तसेच जगत महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डाॅ.चंद्रकुमार राहुले ,सहयोगी प्रा.डाॅ.चैनलाल राणे,प्रा.लोकेश कटरे विचारमंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .कार्यक्रमाचे औचित्य साधून उपप्राचार्य डाॅ. एस. एस.भैरम यांनी शिरवाडकराच्या जीवनकार्यावर समोचित विचार प्रकट केले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता प्रा.जगदीश भैसारे यांनी मार्गदर्शन करतांना कवी कुसुमाग्रज हे जीवनवादी साहित्यीक असून मानवतावाद हा त्यांच्या साहित्याचा स्वभावधर्म होता अशाप्रकारचे मौलिक विचार प्रकट केले तसेच अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डाॅ. एन. वाय. लंजे यांनी मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणे हे आपण सर्वांचे आद्यकर्तव्य असून मराठी ही ख-या अर्थाने आपली जिव्हाळ्याची भाषा असून ज्ञानभाषा सुध्दा आहे अशाप्रकारचे मौलिक मार्गदर्शन करून मराठी भाषेचे जतन करण्याकरीता सर्वांना शपथ दिली.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डाॅ .चंद्रकुमार राहुले,संचालन प्रा.लोकेश कटरे यांनी केले तर आभार डाॅ.चैनलाल राणे यांनी मानले.





