
तिरोडा,दि.08ः- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तिरोडा पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शीतल मोहन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर महिला दिवसानिमित्त शपथ घेण्यात आली.तसेच उत्कृष्ट कार्यासाठी नेहमी तत्परतेने काम करणाऱ्या व कोविड 19 अंतर्गत सातत्याने काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा गौरव प्रशस्ती पत्र देऊन करण्यात आला. कार्यक्रमाला प्रभारी गटविकास अधिकारी डाॅ.पी.एम.गंगापारी,प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी,गटशिक्षणाधिकारी एम.डी.पारधी,सहायक गटविकास अधिकारी सितेश पटले,पर्यवेक्षिका श्रीमती कनकलता काळे, श्रीमती अंजली तणखीवाले, श्रीमती वंदना दाते व शिक्षिका उपस्थित होते. महिलांच्या विषयावर डॉ.मनीषा तारेंद्र रहांगडाले,श्रीमती काळे, पर्यवेक्षिका प्रतिभा लांडगे, पी.एम.गंगापारी यांनी महिलांसाठी शासनाच्या योजना, समाजामध्ये महिलांची भूमिका, महिला चळवळ, जनजागृती व इत्यादी विषयावर प्रकाश टाकला. प्रास्तविक विनोदकुमार चौधरी यांनी केले.तर कार्यक्रमाचे संचालन श्रीमती शीला पारधी यांनी तर आभार श्रीमती ज्योती बोपचे यांनी मानले.श्रीबांश्री, गीता रामटेके यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. तसेंच या कार्यक्रमास महिला शिक्षिका व इतर कार्यालयीन महिला कर्मचारी व इतर अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होते.
स्व. ब्रीजलालजी कटरे हायस्कूल शहारवानी येथे जागतिक महीला दिन कार्यक्रम संपन्न गोरेगाव- स्व. ब्रीजलालजी कटरे हायस्कूल शहारवानी येथे जागतिक महीला दिन कार्यक्रम मूख्याध्यापक आर. वाय.कटरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच टेंभरे सर, बडोले सर,ठाकरे मॅडम व यादव सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आला. प्रसंगी सावीत्रीबाई फूले ,झासीची रानी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी चव्हाण याने केले तर आभार मोहिनी येळे यांनी केले. याप्रसंगी मूख्याध्यापक आर. वाय.कटरे यांनी जागतिक महीला दिनावर व महीलांचे योगदान व समाजातील स्थान मार्गदर्शन केले तर कू. ओ. बी. ठाकरे यांनी विद्यार्थींना महीला व त्यांचे कर्तुत्व व महीला सक्षमीकरण यांवर मार्गदर्शन केले