39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ पवनी शहरात cctv लावण्यात यावे-सिटीजन फोरम पवनी

पवनी शहरात cctv लावण्यात यावे-सिटीजन फोरम पवनी

0
40

blank

चोरी व घरफोडीच्या वाढत्या प्रकरणावरुन मागणी
पवनी: पवनी शहराची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता व तालुक्याचे ठिकाण असल्या कारणामुळे पवनी शहरात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे,अनेक व्यावसायिक,नोकरदार,शेतकरी वर्ग या शहरात स्थायिक आहेत व गुण्या-गोविंदाने राहत आहेत.गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे सर्वसामान्य व व्यावसायिक नागरिकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे.गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण व गाडी चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे.हे या  ऐतिहासिक व शांत शहराला शोभणारे नाही या प्रकरणांमुळे येणाऱ्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.त्यामुळे आपण डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार करून पवनी शहरातील चौका-चौकात,प्रवेशद्वार,सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी CCTV CAMERA लावण्याबाबतचा विचार करावा व जनहिताचा विचार करता तात्काळ निधी व परवानग्या मंजूर करून आवश्यक ठिकाणी CCTV CAMERA लवकरात लवकर लावावे अशी मागणी सिटीझन फोरम पवनी यांच्या कडून आज नगराध्यक्ष श्रीमती पुनमजी काटेखाये यांना करण्यात आली.त्यातून गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण करावा.या पद्धतिचे गुन्हेगारी प्रतिबंधात्मक उपाय अनेक शहरात करण्यात आलेले असून आपल्या शांत शहरात वाढती चोरीचे प्रमाण पाहता cctv ची मागणी लवकरात लवकर मान्य करुन आदर्श व गुन्हे मुक्त शहराची ओळख निर्माण करावी व जनतेच्या मनातील भीती दूर करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली त्यावर “cctv बद्दल चा ठराव मंजूर करण्यात आलेला असून लवकरात लवकर कायदेशीर व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून cctv लावण्यात येईल”असे नगरअध्यक्ष मॅडम कडून सांगण्यात आले.निवेदन देतांना सिटिज़न फोरम पवनी चे वैभव बावनकर,संघर्ष अवसरे,योगेश बावनकर, निशांत नंदनवार,हिमांशु थोटे,हिमांशु बावनकर,कुणाल हटवार,तुषार बावनकर उपस्थित होते

blank