34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील गाईड व जिप्सी चालकांना राशन किट वाटप-अदानी फाउंडेशनचा...

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील गाईड व जिप्सी चालकांना राशन किट वाटप-अदानी फाउंडेशनचा पुढाकार

0
37

blank

तिरोडा,दि.29ःः कोरोना विषाणू मुळे निर्माण झालेली परिस्थिती त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन हे ऐन हंगामात बंद होते आणि हीच परिस्थिती मागील वर्षी सुद्धा होती त्यामुळे याचा मोठा फटका पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या गाईड व जिप्सी चालकांना बसला त्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया मार्फत अदानी फाउंडेशन तिरोडा यांना गाईड व जिप्सी चालक यांच्यासाठी राशन किट पुरविण्याबाबत विचारणा केली असता अदानी फाउंडेशन तिरोडा तर्फे अदानी ग्रुपचे चेअरमन  गौतम अदानी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील 159 गाईड व जिप्सी चालकांना राशन किट वाटप करण्यात आले .यावेळी प्रामुख्याने  आर रामानुजन, क्षेत्रसंचालक, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया, रत्ना बिश्वास ,
पूनम पाटे उपसंचालक, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया, अदानी फाउंडेशन प्रमुख नितीन शिराळकर,रुपाली सावंत सहाय्यक वनसंरक्षक,कोका, श्री.चिवंडे वन परिक्षेत्र अधिकारी उपस्थितीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्निल वाहने अदानी फाउंडेशन,श्री, दोरले वनपाल ,श्री. पटले, श्री.चव्हाण वनरक्षक यांनी परिश्रम घेतले.

blank