
गोरेगाव- वृक्षारोपण केल्यानंतर त्याच्या संगोपनाची जबाबदारी फक्त ग्रामपंचायत प्रशासनावर आपण नामानिराळे राहणे हे चुकीचे आहे. त्याच्या संगोपनाची जबाबदारी ही सर्वांची असल्याने गावकर्यांनी त्यास सहकार्य करून वृक्ष संगोपन करावे असे आवाहन उपस्थित अतिथींनी केले.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सटवा येथील ग्रामपंचायत परिसरात वड या ऑक्सिजन देणार्या झाडांचे रोपण सरपंच विनोद पारधी यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक कार्यकर्ते भागचंद्र रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील टीकाराम रहांगडाले, उपसरपंच ओमप्रकाश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य ओमेंद्र ठाकूर, माजी पोलिस पाटील केशोराव ठाकूर, भोजराज कटरे, दिलीप रहांगडाले, नितीन कटरे, सुनील ठाकूर, रोजगार सेवक घनश्याम बोडणे, चंद्रहास पारधी आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे रोपण केलेल्या झाडावर ‘ तुम्ही मला 3 वर्ष सांभाळा मी तुम्हाला 300 वर्षे सांभाळतो’ असा संदेश लाऊन वृक्षारोपणाचे महत्व विषद करण्यात आले.