32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ बिबट्याच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी, कोसबी जंगलातील घटना!

बिबट्याच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी, कोसबी जंगलातील घटना!

0
77
file photo

blank

सडक अर्जुनी,दि.22 : शेळ्यांसाठी चारा आणायला गेलेल्या शेतकऱ्यावर अचानक बिबटयाने हल्ला केल्याने एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना सडक अर्जुनी प्रादेशिक वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या कोसबी जंगलामध्ये आज रविवारला सकाळच्या सुमारास घडली. देवराम गहाणे असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.कोसबी येथील शेतकरी देवराम गहाणे आपल्या मालकीच्या शेतालगत असलेल्या जंगलात शेळ्यासाठी चारा आणायला गेले असता त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले, जखमी अवस्थेत मध्येच ते गावात चालत आले. दरम्यान त्यांच्या परिवारातील सदस्यांनी त्यांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे दाखल केले आहे. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथे पाठविण्यात आले आहे.या घटनेचीची माहिती वनविभागाला मिळताच घटना स्थळी वनविभागाचे कर्मचारी अधिकारी यांनी येऊन पाहणी केली आहे. या बिबट्याच्या हल्ल्यानंतर गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या सर्व प्रकणाचा पुढील तपास वनविभागाचे कर्मचारी करीत आहे.

blank