शैक्षणीक यंत्रणांनी गुणवत्ता पूर्ण शिक्षणाची कास धरावी-शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर

0
52

गोंदिया,दि.23ः कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर,शासन,प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला निर्णय शैक्षणिक गुणवत्ता टिकविण्यासाठी प्रतिकुल असले तरी शिक्षण क्षेत्रात मात्र नैराश्याचे वातावरण आहे,हे जरी खरे असले तरी,जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत शिकणारा विद्यार्थी, शिक्षणात गुणवत्ता कशी टिकवून ठेवेल,यासाठी जिल्हा स्तरावरील सर्व शैक्षणिक यंत्रणांनी गुणवत्ता पूर्ण शिक्षणाची कास धरावी असे असे आवाहन नव्याने रुजू झालेले प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी केले.
गोंदिया जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने 23ऑगस्ट रोजी आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.या प्रसंगी विदर्भ मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष रामसागर धावडे, संघाचे अध्यक्ष रमेश तणवानी, कार्यवाह बी.डब्ल्यू. कटरे,सी.जी.पाऊलझगडे, भूपेन्द्र त्रिपाठी, प्रदिप नागदेवे,श्रीमती अजया चुटे,श्रीमती बबिता भारद्वाज,भगिरथ जिवानी,डी.बी.गेडाम उपस्थित होते.
प्रारंभी संघाच्या वतिने शिक्षणाधिकारी (माध्यमिक)संजय डोर्लीकर यांचा सत्कार करण्यात आला.यानंतर झालेल्या सहविचार सभेत,विमुसं उपाध्यक्ष रामसागर धावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत, अध्यक्ष रमेश तणवानी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य मार्गदर्शक शिक्षणाधिकारी(माध्यमिक) यांनी पुढिल शैक्षणिक समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.यावेळी शासनाकडून फक्त एक,एक महिण्याचे वेतन अनुदान येत असल्याने, दरमहिन्याला वेतन उशिरा होत आहे. त्यात नियमितता आणण्यासाठी वरीष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार करण्यात येईल.थकीत वेतन देयके,ना परतावा जीपीएफ कर्ज प्रकरणे,वैद्यकिय प्रतीपुर्ती देयके, जी पी एफ पावती, डीसीपीएस जमा तपशील अद्यावत करने इ.रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी सम्बंधित यंत्रणेला आदेशीत करून आढावा घेण्यात येईल.मानव विकास निधी, ईबीसी देयके,मोफत साईकली योजना अंमलबजावणी रखडलेली आहे.ते पूर्ण करण्यात येतील.गत वर्षी पासून ई.बी.सी.शिबीर आयोजन बंद आहे.ते पुन्हा सुरू करण्यात येतील.यासह उर्वरित शैक्षणिक समस्या पुढिल सभेत चर्चेला येतील असे ठरले.सभेचे सूत्र संचालन जिल्हा कार्यवाह बी.डब्ल्यू कटरे यांनी केले आभार सी.जी.पाऊलझगडे यांनी मानले.
या नंतर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी के.वाय.सर्याम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या.
यानंतर संघाचे शिष्टमंडळ उपमुख्य अधिकारी भेंडारकर यांना,राजे रायबहाद्दूर विद्यालय हिरडामाली बाबतच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी भेटले.