आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने नागरी सुविधांच्या ७ कोटी ३३ लाखाच्या कामांना मंजुरी

0
36

*इतिहासात प्रथमच पथदिवे, वॉटर प्युरिफायर, कचरा वाहनांसाठी निधी मंजूर*

गोंदिया–आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे, अलीकडेच गोंदिया विधानसभा नागरा, काटी, कटंगीकला, फुलचूर, फुलचुरटोला, कामठा, पिंडकेपार, कारंजा, खमारी, कुडवाच्या ५०००  पेक्षा अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींमध्ये वर्ष २०२०-२१ मध्ये ग्रामपंचायतींमध्ये 7 कोटी .33 लक्षच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नांनी इतिहासात प्रथमच नागरी सुविधा योजनेअंतर्गत पथदिवे, वॉटर प्युरिफायर, कचरा वाहनांसाठी निधी मंजूर करण्यात यश मिळाले आहे. 7 कोटी 33 लाखांच्या कामांपैकी, ग्रामपंचायत कुडवा मध्ये एकूण 77.50 लाख, ग्रामपंचायत खमारी मध्ये 47.00 लाख, ग्रामपंचायत नगरा मध्ये 70.00 लाख, ग्रामपंचायत काटी मध्ये 65.50 लाख, ग्रामपंचायत कटंगीकला मध्ये 70.00 लाख, ग्रामपंचायत फुलचुरटोला मध्ये 68.00, ग्रामपंचायत फुलचूर मध्ये 97.50, ग्रामपंचायत कामठा मध्ये 67.00 लाख, ग्रामपंचायत पिंडकेपार मध्ये 53.00 लाख, ग्रामपंचायत कारंजा मध्ये 57.00, एकूण 7 कोटी 33 लाख पैकी आमदार विनोद अग्रवाल यांचे प्रयत्नांनी कामे मंजूर झाली आहेत.  यापूर्वी नागरी सुविधा योजनेअंतर्गत केवळ रस्ते, नाले, अशी कामे मंजूर करण्यात आली होती. गावाची मोठी लोकसंख्या असल्याने पथदिव्यांची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, कचरा वाहनांची समस्या, मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये अनेक समस्या निर्माण होत होत्या. आमदार विनोद अग्रवाल यांना याची माहिती होताच त्यांनी ही बाब लक्षात घेतली, व नागरी सुविधांच्या या विकासकामांमध्ये, पथदिव्यांची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, कचरा वाहनांची समस्या निर्माण झाली होत होती. त्यासाठी ही कामे नागरी सुविधा योजनेअंतर्गतही करण्यात यांवी. या साठी मंजुरी मागितली होती. आणि त्यांनी या मागणीमध्ये यश मिळवले आहे. इतिहासात प्रथमच नागरी सुविधा योजनेअंतर्गत ही कामे मंजूर झाली आहेत. यामुळे गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी, कचरा गाडी स्ट्रीट लाईट अशा अनेक समस्यांपासून सुटका मिळेल.