प्रधानमंत्री पीक विमा योजना विमाधारक शेतकऱ्यांनी शेतपिकाच्या नुकसानीबाबत संपर्क करावे

0
34

गोंदिया,दि.25 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीमार्फत गोंदिया
जिल्ह्यात करण्यात येत आहे. विमा कंपनीने जिल्हा व तालुका स्तरावर सर्व सोईसुविधांसह स्वतंत्र कार्यालये स्थापन केलेले आहेत. जिल्ह्यातील सर्व विमाधारक शेतकरी बांधवांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, शेत पिकाच्या नुकसानीबाबत खालीलप्रमाणे आपल्या तालुका प्रतिनिधीशी संपर्क करुन नुकसानीची पुर्वसूचना दाखल करावी.

जिल्हा कार्यालय गोंदिया (देवानंद मेंढे-9637594270), तालुका
कार्यालय गोंदिया (सागर राणे-8788032695), तालुका कार्यालय गोरेगाव (संजय
ठाकरे-9404277583), तालुका कार्यालय तिरोडा (पंकज खोब्रागडे-9673339613),
तालुका कार्यालय आमगाव (संदिप टेंभरे-8208671441), तालुका कार्यालय
सालेकसा (भुमेश्वर मेश्राम-8552930373), तालुका कार्यालय मोरगाव/अर्जुनी
(प्रमोद मेश्राम-9518357914), तालुका कार्यालय सडक/अर्जुनी (चंद्रप्रकाश
येल्ले-9158096945), तालुका कार्यालय देवरी (हरिश तुरकर-9518330495)
अशाप्रकारे संबंधीत विमा प्रतिनिधींचे संपर्क क्रमांक आहेत. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी शेतपिकाच्या नुकसानीबाबत संबंधीत तालुका विमा प्रतिनिधींशी संपर्क करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गणेश घोरपडे यांनी केले आहे.