29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रॅली

0
12

वाशिम, दि. 25  : हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आणि फिट इंडियाच्या अनुषंगाने 29 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथून रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. ही रॅली जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरु होवून बसस्टॅन्ड समोरुन, वसंतराव नाईक चौक, जिल्हा मध्यवर्ती बँक, पोस्ट ऑफीस चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पोलीस स्टेशन रोड ते परत जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीचा समारोप करण्यात येईल. रॅलीकरीता कोविड-19 संदर्भात असलेल्या सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. रॅलीत सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त युवक- युवती तसेच विद्यार्थी – विद्यार्थीनींनी 29 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता पूर्वी जिल्हा क्रीडा संकुल येथे उपस्थित राहावे. असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकात उप्पलवार यांनी केले आहे