गावाची स्वच्छता ठेवून निरोगी ठेवणार्‍यांना बांधल्या राख्या

0
45

देवरी – सर्वांना निरोगी राहण्यासाठी आधी गावातील स्वच्छता ठेवणे ही काळाची गरज आहे. परंतू , ह्या सर्व काळाच्या गरजेला सलाम ठोकून सकाळ सकाळी गावाला स्वच्छ करुन उत्तम सेवा देणारे सफाई कामगार देशाचे नागरिक या नात्याने सन्मानाने चुकून सुद्धा वंचित राहू नये; याची विशेष दखल घेऊन तालुका भाजप महिला आघाडीने देवरी नगर पंचायतच्या कामगारांना स्नेहाने तथा प्रेमाने ओवाळून 28 ऑगस्टला राख्या बांधून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी नगर पंचायतचे मुख्याधिकारी अजय पाटणकर सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते. आगळा वेगळा देवरी नगरातील प्रथमतःच असा भावाबहिणीच्या अतूट प्रेम तथा स्नेहाच्या नात्यातील कार्यक्रमात ओवाळून राख्या बांधताना अनेक मजूर तथा कामगारांच्या चेहर्‍यावरील भावनिक भारावलेले हावभाव मात्र हे वेगळेच होते. तत्पूर्वी असाच आनंदोत्सव पुन्हा दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण सदर भाजप महिला आघाडीने घरदार तथा परिवार सोडून नक्षलग्रस्त भागात व गावात शांतता राखून नागरिकांचे रक्षण करणाऱ्या देवरी, चिचगड येथील पोलीस स्टेशनमध्ये तर, बोंडे येथील पोलीस कॅम्पमध्ये सुद्धा पोलिस निरीक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व पोलिसांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी भाजप प्रदेश कार्यकारीणी सदस्या तथा जि. प. माजी सभापती सविता पुराम, तालुका महिलाध्यक्षा देवकी मरई, माजी नगराध्यक्षा कौशल्या कुंभरे, माजी तालुकाध्यक्षा नूतन सयाम, ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रज्ञा संगीडवार, ओबीसी आघाडी महिला तालुकाध्यक्षा रचना उजवणे, शहर महिलाध्यक्षा माया निर्वाण, माजी नगरसेविका सुनिता जांभुळकर आणि तनूजा भेलावे आदी उपस्थित होत्या.