गोंदिया 2,भंडारा 0,चंद्रपूर 7,बुलडाणा 5,गडचिरोली 8,वाशिम जिल्ह्यात १ कोरोना बाधित

0
66

गोंदिया,दि.2 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 2 सप्टेंबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नविन 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. आज डिस्चार्ज रुग्णाची संख्या 0 आहे.आजपर्यंत 41,204 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 40,496 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 4 आहे. 4 क्रियाशील असलेला बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 576 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 99.27 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.40 टक्के आहे तर डब्लिंग रेट 674.6 दिवस आहे.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य

भंडारा,दि.2 :- जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य निघाली असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक आहे. आज 508 व्यक्तींची चाचणी केली असता 00 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. जिल्ह्यात आता 06 सक्रिय रुग्ण आहेत.आज 01 रुग्ण बरा होऊन घरी गेला असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58945 झाली आहे. आज एकही व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली नाही. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60084 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 50 हजार 368 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 60084 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58945 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 60084 झाली असून 06 क्रियाशील रुग्ण आहे. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ 0.01 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

वाशिम जिल्ह्यात आणखी १ कोरोना बाधित; एका व्यक्तीला डिस्चार्ज

 मालेगाव : शहरातील- १.,एकूण पॉझिटिव्ह – ४१७१३,ऍक्टिव्ह – १०,डिस्चार्ज – ४१०६४,मृत्यू – ६३८

जिल्ह्यात 5 कोरोनामुक्त, 7 पॉझिटिव्ह Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 48
चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 7 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात गुरुवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.
आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 7 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 2, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 1,वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 658 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 70 झाली आहे. सध्या 48 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 77 हजार 494 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 86 हजार 953 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1540 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

बुलडाणा 05 पॉझिटिव्ह • 01 रूग्णाला मिळाली सुट्टी
बुलडाणा-योगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1693 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1685 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 05 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 265 तर रॅपिड टेस्टमधील 1420 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1685 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. राजा शहर : 1, खामगांव शहर : 1, शेगांव शहर : 1, चिखली शहर : 1, चिखली तालुका : धोत्रा 1, लोणार तालुका : कोथळी 1, परजिल्हा दहीगांव ता. भोकरदन, जि. जालना 1, नाशिक 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 08 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 1 रूग्णाला वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात 966 तपासण्यांपैकी 8 कोरोना बाधित तर 8 कोरोनामुक्त

गडचिरोली,  : आज गडचिरोली जिल्हयात 966 कोरोना तपासण्यांपैकी 08 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 8 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30726 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29943 आहे. तसेच सद्या 37 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.45 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.12 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.

     नवीन 08 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 02, अहेरी तालुक्यातील 01, आरमोरी 00, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 00, धानोरा तालुक्यातील 05, एटापल्ली तालुक्यातील 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 00, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 00 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या       नवीन 08 रुग्णामध्ये गडचिरोली मधील  03, अहेरी 00, आरमोरी 00, भामरागड  00, चामोर्शी तालुक्यातील 02, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 02, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 01, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, तर वडसा येथील 00 जणांचा समावेश आहे.