वन अधिकाऱ्यांच्या विरोधात एफ.आय.आर दाखल करा : आ. डॉ. होळी

0
34

सभेला ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा
वाघाच्या हल्यातील मृतकांच्या परिवारांची स्वांत्वनपर भेट व आर्थिक मदत

गडचिरोली- तालुक्यात १३ निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या वाघाला पकडण्यात उशीर करणाऱ्या वनाधिकाऱ्यांवर एफ आय आर दाखल करा असे आवाहन आमदार डॉ देवराव जी होळी यांनी धुंडेशिवणी येथे आयोजित गावकऱ्यांच्या सभेत केले.
यावेळी मंचावर ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शिवनाथजी कुंभारे, पंचायत समितीचे सभापती मारोतरावजी ईचोडकर उपसभापती विलासजी दशमुखे, गडचिरोली गडचिरोली भाजपा तालुका अध्यक्ष राम रतन पोहणे महामंत्री हेमंत बोरकुटे उपस्थित होते. यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी भिकारमौशी येथील मृतक पुंडलिकजी निकूरे, धुंडेशिवणी येथील मृतक दयारामजी चौधरी, व नामदेव गुडी यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली.

यावेळी बोलताना आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले की आपण शासनाकडे या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वारंवार मागणी ,निवेदन, चर्चा व भेटी केल्यात.परंतु शासनव प्रशासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने वर्षभरात आतापर्यंत आपल्याच तालुक्यातील १३ निष्पाप लोकांचा बळी गेला .त्याला संपूर्णता वन प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी गावकऱ्यांना केले. या नरभक्षक वाघाला ठार करावे व दोषी वनाधिकाऱ्यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आपण शासनाला केली असून शासनाने याची गंभीर दखल घ्यावी अन्यथा त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.