पुजारीटोला धरणाचे 6 गेट उघडले,4 तालुक्यात अतिवृष्टी

0
87

गोंदिया,दि.10ः- जिल्ह्यात  आज सकाळपर्यंत आलेल्या पावसामुळे गोरेगाव, सालेकसा, देवरी व सडक-अर्जुनी या 4 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे गोरेगाव 76.0 मिमी,सालेकसा 73.1 मिमी, देवरी 73.2 मिमी व सडक/अर्जुनी तालुक्यात 65.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.यापावसामुळे देवरी व सालेकसा तालुक्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून पुजारीटोला धरणाचे 6 गेट 0.30 मीटरने उघडण्यात आले आहे.त्यामुळे नदी काठावरील गावातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.