शिवसेना पक्षप्रमुखांनी मुकेश शिवहरेंची केली पदोन्नती,शिवहरे जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख

0
153

गोंदिया,दि.10ः- गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शिवसेना पक्ष संघटनेत महत्वाचे फेरबदल शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले असून गोंदिया जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे यांची पदोन्नती करीत संपुर्ण जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे.त्याच प्रमाणे भंडारा जिल्हा सहंसपर्कं प्रमुख म्हणून नरेश डहारे यांची निवड केली आहे.तर पंकज यादव यांची गोंदिया व तिरोडा विधानसभा क्षेत्राचे प्रभारी जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे सुरेंद्र नायडू यांची आमगाव व अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे जिल्हा प्रमुख तर सुनिल लांजेवार यांची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.यापुर्वी मुकेश शिवहरे यांच्याकडे गोंदिया व तिरोडा विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख पद होते.आता नव्या जबाबदारीमुळे त्यांच्याकडे पुर्ण जिल्ह्याची जबाबदारी आली आहे.शिवहरे यांनी पक्षप्रमुखांनी दिलेल्या जबाबदारीचे आपण पुर्णपणे पालन करुन पक्ष संघटनेच्या वाढीसाठी तसेच येत्या निवडणुकीसाठी पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडणुक रिंगणात उतरवण्याची तयारी करण्यात येणार असल्याचे सांगितले.