देवरीत सोमवारला व अर्जुनी मोर येथे रविवारला गणेशोत्वानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

0
42

गोल्डन गणेश उत्सव मंडळा तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन

चिचगड,दि.11:-देवरी शहरातील प्रभाग क्रमाकं १२ येथील “गोल्डन गणेश उत्सव मंडळा” च्या वतिने दि. १३ सप्टेंबर सोमवारला सकाळी ११.०० वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्यानां रक्तदान करावयाचे  आहे त्यानीं गोल्डन गणेश उत्सव मंडळ शेडेपार रोड प्रभाग क्रमाकं-१२ येथ येऊन “रक्तदान हेच महादान” या कार्यक्रमाला सहकार्य करावे अशी विनंती मंडळाच्या अध्यक्षासह सदस्यानी केली आहे.सलग नऊ (९) वर्ष होत आलेल्या या गोल्डन गणेश उत्सव मंडळातर्फे कोरोनाचा प्रभाव पाहता व शासनाच्या नियमाचे पालन करता या कार्यमाचे नियोजन करण्यात आले आहे.

अर्जुनीचा राजा येथे 12 सप्टेंबर ला रक्तदान शिबीर, रक्तदात्यांना आवाहन
अर्जुनी मोरगाव- प्रसिद्ध अर्जुनीचा राजा गणेश उत्सव मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे रविवार 12 सप्टेंबरला सकाळी 10 ते 2 वाजता दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन मंडळाच्या वतीने डॉ.राजेश चांडक,मंगेश बारई,प्रा.सुनील पाऊलझगडे,श्याम चांडक,माजी नगरसेवक देवेंद्र टेंभरे यांनी केले आहे.
अर्जुनीचा राजा मंडळाचे हे पाचवे स्थापना वर्ष आहे.मंडळ दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते.गतवर्षीपासून कोरोना महामारी संकटामुळे शासनाच्या निर्देशानुसार गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहेत.कोरोणा महामारी मुळे देशात रक्ताचा तुटवडा भासत आहे,सध्या परिस्थिती सर्व साधारण असली तरी धोका अजून टळलेला नाही.याच पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची चमू रक्त संकलनाचे कार्य करणार आहे. परिसरातील रक्तदात्यांनी “रक्तदान हे श्रेष्ठ दान”या उपक्रमात सहभागी होऊन आपली राष्ट्रीय जबाबदारी पार पाडावी असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.