कुरखेडा तालुका अपंग संघटनेची वार्षिक आमसभा उत्साहात

0
20

कुरखेडा,दि.14ः– आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा, यांच्या महात्मा गांधी सभागृहामध्ये तालुका अपंग संघटना कुरखेडा यांची वार्षिक आमसभा दिनांक १३ सप्टेंबरला संपन्न झाली. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा. संस्थेचे संस्थापक संयोजक डॉ. सतीश गोगुलवार उपस्थित होते. विदर्भ विकलांग संघटनेचे अध्यक्ष यशवंत पाटणकर,तालुका अपंग संघटना अध्यक्ष तथा सोनेरांगी ग्रामपंचायतीचे सरपंच बाबूराव कुमरे, संगती फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष मालुबाई भोयर, सदस्य शालिनी अंबादे,  जवाहरलाल सयाम प्रमुख अतिथी म्हणून  या आमसभेला उपस्थित राहून दिव्यांगांना मार्गदर्शन केले. यामध्ये सप्टेंबर २०१९ ते जुलै २०२१ या कालावधी मध्ये झालेल्या संघटनेच्या आर्थिक व्यवहार याबद्दल मांडणी करण्यात आली. त्याचप्रमाणे यामध्ये नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. प्रल्हादजी बन्सोड अध्यक्ष, पल्लवी मेश्राम उपाध्यक्ष,भारती नंदेस्वर सचिव,सदस्य नरेश उईके,गोवर्धन तंगल्लीवार,सुधीर बाळबुधे,देवकी सिंगारे,रेशमा वालदे,मंदारामसिंग हारामी, चंद्रशेखर ताराम यांचा समावेश करण्यात आला.

संघटनेने शासनासोबत केलेल्या  धोरण वकिलीतून साध्य झालेल्या  कामाबद्दल संघटना सदस्यांना माहिती देण्यात आली.या संघटनेत कुरखेडा तालुक्यातील ५३२ लोक संघटनेला जुळलेले आहेत.संघटनेच्या मार्गदर्शनातून आणि संस्थेच्या आर्थिक सहकार्यातून दिव्यांग व्यक्ती शेळी व्यवसाय करू लागले आहेत.कुकुट पालन, अर्थार्जनासाठी छोटा किराणा दुकान, महिलांच्या सौदर्याप्रसादनाची दुकान इत्यादी व्यवसायाला स्थायीत्वं यावे म्हणून संस्थेच्या पुढाकाराने “ दिव्यांग व्यक्तीची संगती फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्यात आलेली आहे.ती कंपनी पुढे चालण्यासाठी दिव्यांग व्यक्तीने पुढे यावे. अपली कंपनी म्हणून काम करावे, असेही प्रतिपादन डॉ सतीश गोगुलवार यांनी केले.म्हणाले कि, कोणताही व्यक्ती हा अपंग नसतोच आणि असला तरी तो मनाने असतो, मनाने आणि विचाराने अपंग असलेला व्यक्ती काही करू शकत नाही. मनात इच्छा शक्ती प्रबळ असावी म्हणजे अपंगत्वावर मात करता येतो.तसेच. यशवंत पाटणकर यांनी संघटनेच्या संघटनेच्या एकंदरीत कामाविषयी मांडणी केली. या आमसभेच्या यशस्वीतेसाठी   संगिता तुमडे, लक्ष्मण लंजे यांनी मोलाचे सहकार्य केले,  संचालन  शशिकला दरवडे, प्रस्थावाना यशवंत पाटणकर, आभार किशोर पोरेटी यांनी सहकार्य केले.