37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ शहरात दोन सापांना सर्पमित्राने दिले जीवदान

शहरात दोन सापांना सर्पमित्राने दिले जीवदान

0
34

blank

अर्जुनी मोरगाव-शहरात 16 सप्टेंबरला दोन विविध ठिकाणी सर्पमित्रांनी सापांना पकडून जीवदान दिल्याची घटना घडली.स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती गोडावून आणि रोनक पालीवाल यांच्या गॅरेजमध्ये या सापांना पकडण्यात आले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्रमांक 3 गोडाऊन मध्ये सकाळी 11वाजता दरम्यान मजुरांना धानाच्या पोत्याखाली साप दबा धरून असल्याचे निदर्शनास आले. सर्पमित्र राहुल लाडे,मुकेश पवार यांना प्राचारण करण्यात आले.यावेळी सोबतीला दुर्गेश गायकवाड होते.सर्पमित्रांनी सदर सापाला ताब्यात घेतले.हा साप नाग प्रजातीचा असून तीन फूट लांबीचा असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली.नागाला निमगाव जंगल परिसरात सोडण्यात आले.
दुसरी घटना शहरातील रोनक पालीवाल यांच्या गॅरेजमध्ये आज साढे तीन वाजता दरम्यान साप आढळला.सर्पमित्रांनी या सापाला ताब्यात घेतले.हा साप 7 फूट लांबीचा धामण जातीचा बिनविषारी असल्याची माहिती लाडे यांनी दिली.धामन सापाला इटखेडा जंगल परिसरात सोडण्यात आले.

blank