निराधार महिलेच्या मदतीला कर्मचाऱ्यांची सहृदयता

0
43

कर्मचाऱ्यांनी केला मदतीचा हात पुढे करण्याचा आवाहन

गोंदिया:- मागील आठवड्यात संतत धार असलेल्या पावसामुळे गोंदिया तालुक्यातील मौजा कनार टोला येथील सीमा संतोष मडावी यांचे राहते घर पावसामुळे दिनांक 14 सप्टेंबर रोजी पडल्यामुळे सीमा मडावी ह्या निराधार झाल्या. व त्यांच्या समक्ष आयुष्य कसा जगायचा हा प्रश्न निर्माण झाला.

श्रीमती मडावी ह्या आपल्या एका बाळासोबत याच घरात एकट्याच राहत होत्या. त्यामुळे आता त्यांच्या सामोर आयुष्य जगण्याचे आव्हान सुद्धा आहे. त्यांचे राहते घर पावसामुळे पडल्याने शासकीय मदतीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली व अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासमक्ष आपल्या समस्या मांडल्या. अपर जिल्हाधिकारी यांनी सदर विषयात प्राधान्याने लक्ष देऊन तात्काळ आवश्यक शासकीय योजनेचा लाभ निराधार झालेल्या सीमा मडावी यांना देण्याचे निर्देश अपर तहसीलदार खळतकर यांना दिले.

वर्तमान परिस्थितीला तोंड देण्यासाठी व झालेल्या नुकसानीसाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गोळा केलेले पाच हजार रुपयाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या हस्ते निराधार सीमा मडावी यांना देण्यात आली. एवढेच नाही तर शासनातर्फे योग्य मदत देण्याचे आश्वासन सुद्धा अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिले.

यावेळी अनुसया नागपुरे, मंजू खोब्रागडे, आकाश चव्हाण, किशोर राठोड, मिलिंद बुंदेले, राजकुमार भाजीपाले व इतर कर्मचारी उपस्थित होते. व यांच्या वतीने सदर निराधार महिलेला मदतीचा हात देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.