खमारी येथे परदेशी बढई समाजाच्यावतीने विश्वकर्मा जयंती साजरी

0
37

गोंदिया,दि.17ः-येथील  परदेशी बढई समाज सेवाभावी संस्था गोंदियाच्यावतीने आज 17 सप्टेंबरला भगवान विश्वकर्मा  यांची जयती विश्वकर्मा नगर खमारी येथे साजरी करण्यात आली.यावेळी चाबी संघटनेचे महामंत्री रोहीत अग्रवाल यांच्या हस्ते समाज भवनाचे नियोजित जागेवर भूमीपूजन करण्यात आले.रोहीत अग्रवाल यांचा शा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.आमदार निधीतून समाजभवनासाठी 5 लाखाची घोषणा केली. समाज भवनाकरीता जागा दान करणारे दानदाते सुरेश जांगडे आणि सौ. मंगला ताई सुरेश जांगडे यांचा सत्कार शालश्रीफळ देऊन करण्यात आले.यावेळी खमारी गावचे सरपंच भांडारकर, उपसरपंच लिलाबाई उके. ग्रामपंचायत सदस्य मनोहर साखरे,ममताताई वाढवे, चंद्रशेखर वाढवे उपस्थीत होते.या कार्यक्रमास  हरीचंद आगरे, भास्कर जांगडे, श्याम सांडेल, कवडु खळोदे, राधेश्याम खळोदे, नाथुराम विश्वकर्मा व त्यांचे संपुर्ण कुटुंब कार्यक्रमास उपस्थीत होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ताराचंद बिल्लोरे अध्यक्ष, उमाकांत सरोदे सचिव, डाॅक्टर प्रकाश नागपुरे, गणेश जांगडे, राजेश जांगडे,पुरणचंद आगरे,देवीदास खळोदे,मुकेश सरोदे, मोतीलाल सांडेल, मदन आगरे यांनी अथक प्रयत्न केले.