दारु पाजणार्‍यांना मते देऊ नका-बेदरकर

0
11

लाखनी :दि. १९- निवडणूक काळात नवरा ज्यांच्याकडून दारु पितो त्यांनाच मतदान करण्यास बायकोला आदेश देतो. महिलांनी मात्र आपल्या विवेक बुद्धीचा वापर करूनच चांगल्या उमेदवारांना मतदान करावे, दारु पाजणार्‍यांना मतदान करु नका असे आवाहन प्रा.सविता बेदरकर यांनी केले. लाखनी येथे आयोजित दारुबंदी मेळाव्यात त्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या.
शेतकर्‍यांना दूध घरोघरी जावून विकावा लागतो, दारुवाला एकाच ठिकाणी बसून विकतो. दारु वाईट असली तरी सरकारे ती बंद करणार नाहीत. महिलांनी दारुबंदीसाठी संघटीत होवून लढा उभारण्याची गरज आहे, न्याय मागून मिळत नाही तो संघर्ष करून मिळवावा लागतो. अंधार झाल्यावरच पणतीची आठवण येते. अशा मार्मीक शब्दात सविता बेदरकर यांनी मेळाव्यात उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद््घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून दारुमुक्ती अभियान समितीचे जिल्हा संयोजक नरेश बोपचे, अँड.तानाजी शिंगाडे, पं.स. सदस्य रजनी पडोळे, माजी जि.प. सदस्य रुपलता जांभुळकर, लाखनीच्या माजी सरपंच उर्मिला आगाशे, सालेभाटा येथील दारुबंदी कायकर्ते कैलाश भगत, नगरपंचायत सदस्य धनू व्यास, सामाजिक कार्यकर्त्या शाहीन पठाण, माजी पं.स. सदस्य सुषमा कापगते, पिंपळगावचे ग्रा.पं. सदस्य बाळा शिवणकर, लोकमत सखी मंच संयोजिका काटकर, शर्मिला खंडारे, रेखा कोचे, सुधीर सगनवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.आयोजनासाठी व्यसनमुक्ती महिला संघर्ष समिती सावरी / मुरमाडीच्या पदाधिकारी मंदा गभने, ललीता फुलेकर, पुष्पा डुंभरे आदींनी सहकार्य केले. (