लपा विभागाला ग्रासले रिक्त पदाने

0
21

सालेकसा दि. १९-येथील स्थानिक स्तर उपविभागीय लघु पाटबंधारे विभाग कार्यालयावर सालेकसा, आमगाव आणि गोरेगाव या तीन तालुक्याच्या कामाच्या बोझा अभियंत्यावर आहे. सोबतच इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने लघु पाटबांरे विभागातील अनेक कामे खोळंबून पडलेली आहेत.तर नव्याने रुजु झालेले उपविभागीय अभियंता हे गोंदिया-सालेकसा फिरण्यातच गुंग आहेत.ते मुख्यालयी सुध्दा राहत नाही.

ग्रामीण भागासाठी शेतकरी वर्गासाठी वरदान ठरणारा लघु पाटबंधारे विभाग मनुष्यबळाअभावी कामकाज व्यवस्थीत करू शकत नाही. याचा फटका सर्व सामान्य लोकांना बसत आहे. याचा प्रत्यय या लघु पाटबंधारे विभागात दिसून येत आहे. येथे उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत एम.सी.नागभिरे यांच्याकडे गोंदिया येथील कार्यालयाच्या सुध्दा अतिरीक्त कार्यभार आहे.कार्यालयात सहा अभियंताची पदे मंजूर असून  फक्त दोनच अभियंते कार्यरत आहेत. त्यापैकी एक सेवा निवृत्तीच्या मार्गावर आहे. त्यामुळे फक्त एकच अभियंत्याच्या भरवश्यावर तिन्ही तालुक्याच्या लघु पाटबंधारे विभाग चालत आहे. सहा पैकी आर.जी. बेवलकर आणि कनिष्ठ अभियंता आणि आर.व्ही.कपूर शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहेत. यापैकी यांनी व्ही.आर.एस.सेवानिवृत्ती चा अर्ज टाकला आहे. त्यांना सेवानिवृत्ती मिळाल्यास फक्त एका शाखा अभियंताच्या भरवश्यावर पाटबंधारे विभागाची कामे चालणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.  कनिष्ठ लिपीकाचे तीन पद मंजूर आहेत. परंतु यापैकी एक लिपीक मागील एका वर्षापासून बेपत्ता आहे. अनुरेखक एक पद असून कार्यरत आहे. स्थापत्य सहायक एक पद भरलेले आहे.

शिपाई दोन पद मंजूर असून एकच कार्यरत आहे. महत्वाचे म्हणजे या विभागात अभियंताची पद सर्वात महत्वपूर्ण असून ते पद भरलेले नाही. त्यामुळे तिन्ही तालुक्यात महत्वपूर्ण प्रकल्पाचे काम रखडलेले आहेत. सालेकसा तालुक्यात मानाकुही व पांढरी येथील तलावाचे काम व नहराचे काम अनेक वर्षापासून थंडबस्त्यात आहेत. प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे.