
अर्जुनी /मोर :– स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गोंदिया जिल्ह्यात आयोजित स्वच्छता मोहिमेमुळे ग्रामपंचायत कार्यालय स्वच्छ, आणि ‘नीट अँड क्लीन ‘झाले आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायत पवनी/धाबे कार्यालयातही आज ही मोहीम राबविण्यात आली आहे. दरम्यान सरपंच पपीता ताई नंदेश्वर, उपसरपंच पराग कापगते, सदस्य श्रीमती दीपिका चुटे, सुशीताई मडावी यांनी सांगितले की,संपूर्ण भारत देश आणि राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून स्थायीत्व सुजलाम अभियान राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. याअंतर्गत आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाची सफाई केली आहे. तसेच श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे..ही मोहीम 25ऑगस्ट पासून सुरु झाली असून ती 100 दिवस चालणार आहे. त्या अनुषंगाने ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
या मोहिमेत सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, ग्रामसेवक तसेच मान्यवर गावकरी मंडळी आणि युवकांनी सहकार्य केले आहे.