गडचिरोली पोलीस दलास ‘सर्वोत्कृष्ट पोलीस घटक’ म्हणुन दोन पुरस्कार जाहिर

0
10

गडचिरोली-महाराष्ट्र पोलीस दलात सर्वोत्तम कामगिरी व तंत्रज्ञानाचा सर्वोत्कृष्ट वापर आणि सामाजिक पोलिसिंग मध्ये पुढाकार घेऊन यशस्वी कामगिरी केल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलास सर्वोत्कृष्ट पोलीस घटक ’ पुरस्कार देण्याची घोषणा राज्याच्या पोलीस विभागाकडून करण्यात आली. यामुळे गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवल्या गेला आहे. एकाच वेळी दोन सर्वोत्तम पुरस्कार जाहीर होण्याची ही पहीलीच वेळ आहे. या पुरस्कारासाठी परिश्रम घेणाऱ्या जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक अंकित गोयल यांनी अभिनंदन केले आहे.  

महाराष्ट्र पोलीस दलामध्ये राज्यातील पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी आणि वाढविणे, तसेच दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, गुन्हेगारीला प्रतिबंध आणि तपास, आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पोलीसांच्या वतीने ‘ सर्वोत्कृष्ट पोलीस घटक ’ पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यावर्षी राज्यातील सर्व पोलीस घटकांकडून करण्यात आलेल्या कामगिरीच्या आधारावर राज्यातील पोलीस घटकांची तीन श्रेणीमध्ये विभागणी केली होती.

गडचिरोली पोलीस दलास अ प्रवर्गात अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) महाराष्ट्र राज्य, मुंबई. यांचे कडून ‘ सर्वोत्कृष्ट पोलीस घटक ’ निवड करण्यात आली. असून तंत्रज्ञानाचा सर्वोत्कृष्ट वापर आणि सामाजिक पोलिसिंग मध्ये पुढाकार या करिता पुरस्कृत करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशिल असुन, जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. तसेच जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी हाताळावी लागत असते. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील नक्षल हालचालींवर अंकुश मिळवत गडचिरोली पोलीस दलाकडून उत्कृष्ठ कामगिरी पार पाडल्या जात आहे. गडचिरोली पोलीस दलास अशा प्रकारे दोन ‘सर्वोत्कृष्ट पोलीस घटक’ पुरस्कार जाहीर होण्याची ही पहीलीच वेळ आहे. पुरस्कार घोषित झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी गडचिरोली पोलीस दलात अतिशय खडतर सेवा बजावत असलेल्या सर्व अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.