जनसमस्या निवारणासाठी गौतमनगर बाजपेई वार्डातील नागरिकांचा “सामाजिक एकता मंच”

0
21

गोंदिया:- संविधान मैत्री संघ आणि गौतमनगर बाजपेई वार्ड प्रभागातील जागरूक नागरिकांनी जनहितासाठी एक सार्थक पुढाकार घेऊन प्रभाग परिसरात भाईचारा बंधुता प्रस्थापित करण्यासाठी तसेच जन समस्या आणि समस्यांचे निवारण करण्यासाठी “सामाजिक एकता मंच” ची स्थापना केली. “सामाजिक एकता मंच” स्थापन करण्याचा निर्णय येथील संविधान मैत्री संघने रविवार दि.19 सप्टेंबर रोजी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, मुर्री रोड येथे बोलावलेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे, अवामे मुस्लिम संघटन गौतमनगरचे अफजल शहा (छन्नू भाई), मुख्याध्यापक दिनेश गेडाम, हिवराज शहारे, अशोक पटले, बंडू सोरते, महिला वर्गातून छाया अँड्र्यूज, आशा वासनिक, युवा वर्गातून निसर्ग बनसोड, तैसीम शहा, प्रामुख्याने उपस्थित होते.
गौतम नगर बाजपेयी वार्ड प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष -विपक्ष, जात-धर्म,, स्वार्थाचे राजकारण सोडून लोकशाही -घटनात्मक मूल्यांचे रक्षण करणे, राष्ट्र निर्माण करणे आणि सार्वजनिक हित साध्य करण्यासाठी सामाजिक ऐक्य राखण्याचा ऊद्देश्य ठेऊन सामाजिक एकता मंच “ची स्थापना सामाजिक एकता बैठकीत झाली. सभेची सुरुवात संविधान प्रस्तावनेच्या वाचनाने झाली आणि या निमित्ताने सर्वांनी मिळून जनहितासाठी काम करण्याचा संकल्प केला. माजी नगरसेवक हेमंत बडोले, डॉ.राजेश वैद्य, बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष बाबुराव जनबंधू, अनिल गोंडाणे, राहुल वालदे, सय्यद मुनीर, सोमू गणवीर, वामन गजभिये, सेवकराम मेश्राम, आरिफ कुरेशी, नसीम सय्यद, रवींद्र जगणे, नसीम शाह, अप्पू सय्यद , बबलू शेख, मोनू सतिसेवक, राजकुमार मेश्राम, महेंद्र बनसोड, जयश्याम खोब्रागडे, अश्विन गजभिये, नीलेश बनसोड, कमलेश कावळे, प्रमोद धाले, सलीम शेख, मनोज हेडाऊ, रामकिसन बोरकर, शेख हमीदभाई, सोहेल शेख इत्यादींनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. या बैठकीत मुख्याध्यापक दिनेश गेडाम, अफजल शहा, हिवराज शहारे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले आणि संचालन अतुल सतदेवे यानी केले. निसर्ग बन्सोड नी तरुणांच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले.