तुमसरच्या रेल्वेसुरक्षा बल कार्यालयात आढळल्या दारुच्या बाटल्या

0
12

 तुमसर-दि. २६ –रेल्वेस्थानक तथा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेकरिता तुमसर रोड येथे दक्षिण पूर्व रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा बलाने कार्यालय सुरु केले. या कार्यालयात सुरक्षा अधिकारी तथा इतर कर्मचारी कार्यरत आहे. कार्यालयाजवळील महिला व पुरुष बंदीगृहाजवळच दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई – हावडा या प्रमुख रेल्वे मार्गावर तुमसर रोड दक्षिण पूर्व रेल्वेचे महत्वपूर्ण जंक्शन आहे. दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय नागपूर असून त्यांचे अंतर केवळ ८१ कि.मी. आहे. नागपूर नंतर गोंदिया व तुमसर रोड येथे रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व इतर कर्मचारी आहेत.

 रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या संपत्तीसह रेल्वे प्रवाशांची सुरक्षेची जबाबदारी ज्या महत्वपूर्ण कार्यालयाकडे आहे त्या कार्यालयाच्या आवारातच मद्याच्या रिकाम्या बॉटल्स दिसणे ही अत्यंत निंदणीय व चिंतेची बाब आहे. ऐरवी रेल्वे सुरक्षा बल कार्यालयाकडे जाण्याची कुणीच हिंमत करीत नाही. रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व इतर पोलीस कर्मचारी येथे तैनात राहत असल्याने मद्याच्या रिकाम्या बाटल्या कोण नेणार असा प्रश्न उपस्थित होतो. या सुरक्षा बलाचे कर्मचारी येथे मद्य प्राशन करतात काय? हा मुख्य प्रश्न उपस्थित होतो.